तू चाल सखे पाउलवाट
अंधार नभांना मिळता !!
घे धाव मुक्त आसक्त एक
चंद्राचा मार्ग उजळता !!
मी तोच तिथे ;थांबती जिथे
पाउल वाटा घनरानी !!
पाहतो वाट ;डोळ्यांत उभे
देऊळ तुझ्या प्रेमानी !
एकटीच ये ;एकांत वनी
घेऊन बहर प्रीतीचा !!
होऊन विजेची ओळ
करी स्वीकार तुझ्या मेघाचा !!
----------'-'लेखन -हर्षल
करी स्वीकार तुझ्या मेघाचा !!
----------'-'लेखन -हर्षल
No comments:
Post a Comment