कसा आस तोलून आकाश भरते
ऋतुंच्या बदलती सुरंगी कमानी
तुझी मूर्त माया तरीही न ढळते
तुझे भास दाटून येती दिशांनी !
इथे स्वप्न मैफिल सजते सुखांची
तुझा स्पर्श गंधार घुमतो तिथे !
उरातून वाहे अशी आस जळती
तुझे हास्य स्मरणात जगते जिथे !!
असा काळ ओलांडतो देह माझा
तरी वेड जालीम काही निघेना !!
उगा सांजवेळी अवेळी उमलतो
पसारा स्मृतींचा कधीही सरेना !!
निराळेच एकांत येतात भवती
मनाचे मनाला न कळती इशारे !!
अशा उंच विरहार्त उद्दाम लाटा
बुडाले सुखांचेच सारे किनारे !!
____-----'''''__________हर्षल
No comments:
Post a Comment