इथे गाजती नाद ओल्या सुरांचे
इथे सांजवेळी पहारे सुखांचे !
इथे या तळ्यांच्या विहारामधुनी
सखे ,वाहती रंग या चांदण्यांचे !!
किनारे असे रंगती सांजकाली
मिसळतात डोहांमध्ये वृक्षवेली !
इथे सावल्यांचे उमलले पिसारे !
मनाला मनाचेच कळती इशारे !!
उठे पाय माझा निळ्या वाळवंटी
तुझी वाहते आस माझ्या उरी !
तुटे वेध आता दिशांचा दहाही
बरसतील आता प्रीतीच्या सरी !!
नभांतून चंद्रार्क मिसळून गेले
असा मग्न अवकाश उतरे इथे !
जलांच्या वरी डोलती मंद वारे !
तुझी साद येता तीरांच्या इथे !
उभी तू किनारी; तुझे हास्य दिसता ,
वितळले तळ्यातून आयुष्य हे !
निळ्या सांजवेळी निळाई मधुनी
उतरले निळे प्रीत संगीत हे !!
-_--__-__ लेखन - हर्षल !!
इथे सांजवेळी पहारे सुखांचे !
इथे या तळ्यांच्या विहारामधुनी
सखे ,वाहती रंग या चांदण्यांचे !!
किनारे असे रंगती सांजकाली
मिसळतात डोहांमध्ये वृक्षवेली !
इथे सावल्यांचे उमलले पिसारे !
मनाला मनाचेच कळती इशारे !!
उठे पाय माझा निळ्या वाळवंटी
तुझी वाहते आस माझ्या उरी !
तुटे वेध आता दिशांचा दहाही
बरसतील आता प्रीतीच्या सरी !!
नभांतून चंद्रार्क मिसळून गेले
असा मग्न अवकाश उतरे इथे !
जलांच्या वरी डोलती मंद वारे !
तुझी साद येता तीरांच्या इथे !
उभी तू किनारी; तुझे हास्य दिसता ,
वितळले तळ्यातून आयुष्य हे !
निळ्या सांजवेळी निळाई मधुनी
उतरले निळे प्रीत संगीत हे !!
-_--__-__ लेखन - हर्षल !!
No comments:
Post a Comment