वेगळे आभास माझे
विश्व स्वप्नांपार माझे!
सूर्य माझा वेगळा अन
वेगळे अंधार माझे !!
सांजकालीन पर्व उतरे
दु:ख रात्रींतून धावे !
शब्द होती कंठ तेंव्हा ;
प्राण कंठातून वाहे !
मावळे त्या दूर रानी
सुर्य एकाकी दिशेनी !
कोवळ्या मेघांत तेंव्हा
अडकुनी नि:श्वास जाती !!
ती निळाई सागरांची ……
भोवती सजले किनारे !
वाहती लाटा निराळ्या
वेगळे त्यांचे इशारे !!
मी सुखांचे सोडले
आभाळ सारे !
वाहिले हे वेदनांचे
जाळ सारे !!
वादळांचे गुज ;
माझे गीत झाले !!
दुख जे हृदयात ;
ते संगीत झाले !
-------------@@____हर्षल
ती निळाई सागरांची ……
भोवती सजले किनारे !
वाहती लाटा निराळ्या
वेगळे त्यांचे इशारे !!
मी सुखांचे सोडले
आभाळ सारे !
वाहिले हे वेदनांचे
जाळ सारे !!
वादळांचे गुज ;
माझे गीत झाले !!
दुख जे हृदयात ;
ते संगीत झाले !
-------------@@____हर्षल
No comments:
Post a Comment