शब्द गीतातील माझ्या
नित्य येथे नांदतील !!
शब्द ते माझेच तुजला
सत्य माझे सांगतील !!
दु:ख माझे ; सुख माझे
वाहिले एकांत जे ,मी !
अंतरातील भाव अवघे ;
शब्द माझे मांडतील !!
पंथ जे, मी चाललो ;
आयुष्य मी जे, पाहिले ,
जन्म हा जगलो जसा मी ,
स्वप्न मी जे, पाहिले ….
तेच सारे शब्द झाले
गीत होऊन राहिले !!
पंथ जे, मी चाललो ;
आयुष्य मी जे, पाहिले ,
जन्म हा जगलो जसा मी ,
स्वप्न मी जे, पाहिले ….
तेच सारे शब्द झाले
गीत होऊन राहिले !!
No comments:
Post a Comment