अवघ्या वीजा मी झेलल्या … सगळी उन्हे मी सोसली !
मज सांग आयुष्या ,आता अजुनीही काही राहिले ?
अजुनी कसा हा तेवतो ,मग मंद आशेचा दिवा?
आता मला फसवायला ,कुठले निमंत्रण राहिले ??
होता न साधा एवढा ,जो शब्द मी तुजला दिला …
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले !!
ओसाड माझे घर तसे नाही पहाण्यासारखे !
हे आसवांचे तेवढे अद्याप तोरण राहिले !!
------------- सुरेश भट -- ( स्वैर बदल )

No comments:
Post a Comment