"तुला भरवू का ,सोहम ?"
" ना.."
"असे काय करावे ..बाळा ?"
"ना ..ना ..."
"अग ,त्याला लगावं दोन चार रट्टे ! ...लाड करून करून माजलाय !"
"अहो .. काय भाषा ही ...गोंडस पोराला असे बोलताय? प्रोफेसर आहात ना ..बाहेर अगदी गोड ..आणि घरात स्वतःच्याच बाळाला असे बोलताय ?"
"त्या आपल्या गोंडस कार्ट्याने माझ्या बॅगेतून मार्कर काढून माझ्या पांढऱ्या नवीन कुडत्यावर नक्षी काढलीये ,! धरून चोपणारे बघ मी !"
"" वाकल्या तिकल्या ...माल्ल्या ..मी लेघा ... बाबू च्या डेस वल !"
"थांब तुलाच वाकडा तिकडा करतो ! आईच्या लाडाने शेफारलाय !"
" अहो ,तुम्ही का चिडचिड करताय इतके ?..लहान आहे आपला मनुडा ...! बघा कसा हसतोय गुंडू ! ...ये .. ग ..ती माझी पप्पूडी ...माज्जा तो गोग्गोड सोन्या !!...बाबूला म्हणावं मला ओड्डू नका ...मी मश्ती कलनाल नाही तल कोन कलनाल ?..विचार बाबांना !""
" आम्ही असली मस्ती करत नसू .... विचार तुझ्या सासूला !"
" आईच परवा सांगत होत्या .... 2 कि 3 वर्षाचे असताना बाबांची टोपी जाळली होतीत फुलबाजीने आणि आईंच्या हाताला पण भाजले होते !"
" काय सांगतेस ...!! ..बर ..बर .!! ..हो ...आई म्हणाली होती एकदा ...! पण ते मुद्दाम नव्हते केले ! अगदीच पिंटुकला होतो मी.. i mean किती छोटा होतो ...त्यावेळी !"
"मग हा अजून 3 होतोय पूर्ण .... मोठा झालाय का इतका ?बिचारा ...बघा कसा बघतोय तुमच्याकडे ? अजून ओरडा माझ्या पिल्लावर ! "
" अरेच्चा ! कोण रुसलंय बाबावर "! बाबू चा डेस याक याक होता .....कोणीतरी छान छान लेघा माल्ल्यात ? त्याला बाबू गम्मत देणारे ! आमच्या पिल्लू ला कोण ते ओरडले !! आईला शांगा ....बाबू चूकून ओरडला आमच्या मनूडी ला !! ..ये इकले ....बाबाकडे "!!
"" वाकला तिकला ....बाबू चा डेस ....बाबू कले जायचा ""
----------------------- +*****-----------------