डार्विन चा मनुष्य उत्पत्तिचा सिद्धांत अर्धवट आहे किंवा अपूर्ण आहे असे मान्य करूनही काही प्रश्न उरतातच !! त्यामुळे डार्विनच्या सिद्धांतालाच बळकटी येते की काय अशी शंका आम्हास वाटते !!
काही माणसे माकडापेक्षाही विचित्र वागतात .... आणि काही माकडछापच असतात !! काही माणसांना माकडासारखी वागणारी माणसे(?)आवडतात ..तर काही माणसे माकडछाप माणसांवर नुसता विश्वासच नव्हे तर जीव सुद्धा लावतात !! माकडालाही लाज वाटेल इतक्या मूर्खपणे काही माणसे (?)स्वतःचे आयुष्य कुठल्यातरी मूर्ख आवडीपायी वाया घालवतात ... आणि कुणी स्वत: सुज्ञ आणि शहाणे असूनही एखाद्या माकडाहून माकड असणाऱ्या वेडपटावर विश्वास टाकून स्वत:ची धूळधाण उडवून घेतात !! .....
या सगळ्यावरून ... माणसाचा पूर्वज माकड नव्हताच असे नक्की म्हणता येइल काय ? किंबहुना असे म्हणता येईल की ,काही माणसांचा पूर्वज नक्की डार्विनने म्हण्टल्या प्रमाणे खरोखरच "माकड" असावा !!
माणसाला एखादे उत्तम रत्न सापडले तर त्याची किम्मत त्याला समजते ....तो त्यास जपून ठेवतो ! तेच रत्न जर माकडाला सापडले तर तो त्या रत्नाला चावून ..वास घेउन आणि अखेर फोडूनही पाहतो आणि काहीच सापडत नाही म्हणून शेवटी मातीत फेकून देतो !! .....फरक इथेच आहे ... माणसात आणि माकडात !!
" देवाने उत्तम बुद्धी व निर्णय घेण्याची शक्ती दिलेली असूनही .... माकडापेक्षा किंचीतही अधिक बुद्धी न वापरणारे "दुर्दैवी" लोक पाहिले की ,कीव येते आणि वाईटही वाटते !! आणि " डार्विनचा" सिद्धांत अगदीच खोटा नसावा असे वाटू लागते ! "
अर्थात काही गोष्टींना ईलाज नसतो आणि उत्तरही नसते !! ...... फक्त माणसाने आपण "माकड" तर होत नाहीयोत ना , याची काळजी घ्यावी हीच सदिच्छा !!
--्---्---्--=--्---्-== ( हर्षल ) (2016)
No comments:
Post a Comment