Saturday, September 24, 2011

****** मराठी *****

सामर्थ्य पाहता फार ;नाही त्या पार देश सीमांचा..
झळकते उग्र तरवार;मराठी वार; सत्य-धर्माचा 1]              

साहते किती अपराध ;सोसते पाप;भार यवनांचा..
शेवटी द्रोह अंगार ;उसळतो ज्वार संगरांचा ..2]

एकेक पुत्र चेतवी;ओतुनी प्रेम ;ओढ़ ;मायेची
जन्मती धुरंदर किती हाक ऐकता एक मातेची ..3]

शोभले किती नर मणी ;हिच्या मस्तकी रूढ़ जाहले;
ही माय मराठी ;हीनेच अवघे वीर-शूर प्रसवीले !4]

पाहतो आजही तिला;मानतो तिला ;तिला वंदितो..
आयुष्य सर्व हे ;सदा तिच्या उद्धारास्तव वाहितो..5]

येऊ दे, घोर संकटे ;मराठ्यां पुढती ;
हे सोसून अवघे हाल ;तरी त्यावरती
उन्मत्त हरवूनी गनीम ;विजयी ठरती
मृत्युस देउनी; जरब ;नमवीतो त्याला..!!
हे शौर्य शिकवीते;माय मराठी माती!!
.............written by .[me]-हर्षल

Monday, September 12, 2011

एस्ट्रोजेन आणी टेस्टोस्टेरोन..[estrogen and testosterone]

समस्त विश्वात पुरुष आणी प्रकृति ...निवास करतात ...पुरुष आपल्या भोवती प्रकृति चे आवरण घालून सतत कार्यमान राहतो...!!..इति वेद..!!


"पुरुष"आणि"प्रकृति"...म्हणजे इश्वर आणि माया...!!..पण आपण मानवान्बद्दल बोलतोय..!!
..मानवी जीवनात "पुरुष"म्हणजे "नर"...आणि प्रकृति म्हणजे "नारी".......आणि एस्ट्रोजेन आणी टेस्टोस्टेरोन ..ही त्यांची विशेष संप्रेरके ..[hormones]....!!..एस्ट्रोजेन स्त्रित्वाचे तर टेस्टोस्टेरोन पौरुषाचे...!!..
.
....एक तरुण ;सुंदर मुलगी कॉलेजात जाते....बऱ्याच तरुण पोरांच्या चर्चेचा विषय होते...तिला वाटते आपले सौन्दर्य पाहतात ..ती मनात खुश असतेच..पण त्याच बरोबर सावध सुद्धा....एखादा आवडतो सुद्धा ..ती त्याला नीट पाहते...शरिरापेक्षा मन..आणी मनापेक्षा स्वभाव...मनात तो जरी भरला..तरी ओठांवर यायला वेळ लावते...स्वताशी त्याची तुलना करते..........एस्ट्रोजेनचा प्रभाव..!!




तेच,..एखादा वयात आलेला मुलगा तिला पाहतो.. ..तिचे सौंदर्य..तिची मोहकता ..यांतच रमतो...आणी नेमके तिचे मन तेवढे विसरतो...पण तो म्हणतो "मला ती आवडते".....अगदीच आकर्षण असेल तर तिला वाटेल ते करून आपलेसे करण्याचा प्रयत्न करतो............ टेस्टोस्टेरोनचा प्रभाव..


स्त्री पुरुषापेक्षा अधिक भावनाशील असते ...स्वताच्या भावनान्मधे इतकी रमते..की त्यालाच सर्वस्व मानते..........एस्ट्रोजेन


पुरुष विचार करतो..समजून घेतो..भावना समजल्या तरी त्यांची मोहिनी सहसा पडत नाही...विचारान्पेक्षा विकार प्रबळ ठरतात..बरेचदा ....!!टेस्टोस्टेरोन.!!


एक लहान गोंडस मुलगी ;तीला टेडी बीअर शिवाय झोप येत नाही...त्याचे निर्जीव कापसाचे शरीर जीवंत भासते तीला..ती त्याला जमेल तितके प्रेम करते ..अगदी वयात आली तरीही हे प्रेम आटत नाही ..बरेच लोक तीची चेष्टा करतात .....मी मात्र स्वतशीच म्हणतो "एस्ट्रोजेनचा सुंदर प्रभाव"..!!


आणी कधी दिसते की एखादी सोशिक मुलगी ..तरुण वयात वैधव्य प्राप्त झाले तरीही निर्विकार जगत राहते..तिच्या पोटच्या पोरासाठी...शारीरिक मोह नीकराने पार करून.....मी म्हणतो मनात ..एस्ट्रोजेनचा अजुन एक सत्वशील पुरावा..!!


आपल्या पत्नीवर समर्थ तेने प्रेम करणारे ..धैर्यवान पुरुष ..तिच्यासाठी रात्रंदिवस कष्ट सोसून तिच्या मुखावर हास्य निर्माण करणारे ..ते लोक पाहून...मला मिळतो.." टेस्टोस्टेरोनचा एक प्रभावी तेजस्वी संकेत"...


आणी कधी ऐकतो आपण ...भर रस्त्यात केलेले स्त्रियांचे विनयभंग ..;नीराश्रीत महिलान्वरचे भीषण बलात्कार....उन्मत्त पुरुषांच्या अनावर वासनान्नी केलेले....स्त्रीच्या मनाची ;सत्वाची वासलात लावणारे घोर पुरुषी अत्याचार...एका क्षणिक पिसाट सुखासाठी केलेले.......मी तेंव्हा समजतो.. टेस्टोस्टेरोनचे महा भयाण स्वभाव..!!
,,,,,,,,,,
.......इतक्यात एखादी माता दिसते मला ..शांत ..शीतल ;प्रेमार्द्र ..आपल्या मुलाला प्रेमाने घास भरवणारी...गरीब घरात राहून सुखात दिसणारी ...सर्वांची सेवा करत मूकपणे दुःख प्राशन करणारी ..........
आणी एखादा बाप दिसतो...कठोर पण प्रेमळ; अगदी मुलींची वेणी घालून देणारा ..त्यांना जीव लावणारा..पत्नी आजारी असताना अख्खे घर सांभाळणारा..रक्षण करणारा ...सासरी निघालेल्या पोरीला बघून लहान मुला सारखा रडणारा................


मी विचार करतो..ह्या आई बापान्मधे ही "एस्ट्रोजेन आणी टेस्टोस्टेरोन. " असतातच...नव्हे आहेतच.......पण खर सांगू का; नुसत्या होर्मोन्स चा प्रभाव इथे मानायला मन तयार नाही होत......वाटत अजुन काहीतरी नक्कीच असले पाहिजे ...बहुतेक "संस्कार" "संस्कार " म्हणतात तेच आकार देत असावेत या होर्मोन्स ना...........नाहीतर इतका त्याग अवघड आहे..नाही का?.....!!........लेखन --हर्षल

Wednesday, August 31, 2011

...परमेश्वर >>>>!!

परमेश्वराचे नाद ..मला ऐकायचे होते..
पहायचे होते..त्याचे सम्पूर्ण निर्विकार सौंदर्य..
त्याची कृपा..त्याचे प्रेम..ईश्वराच्या सर्व साक्षीत्वाचा..अनुपमेय आल्हाद..!!


म्हणून देवाला मी शोधले ..दहा दीशान्तून ..
देशा -देशांतून ...मनांतून ...तनान्तून ...!!
ओसाड रानान्तून ;निष्प्राण प्रेतान्तून ...
जमिनीच्या पोटा -तून ..आकाशाच्या ओठांतून ...
आणी हो ..मूर्ती तून ...देवालयानतून ..!!
स्मशानान्च्या राखेतून ... ..द्रोहातून ..
प्रेमातून ..क्रोधातून ..!!
.सर्वत्र पसरलेया तमातून...
अतिवोन्नत तेजांतून ...!!
पण सापडले फ़क्त त्याचे अस्पर्श आलेख ...
संभ्रमांचे पाश ..तेहि सुरेख ..!!


बुद्धीने .सांगितले अंतिमत: .".देव असेलही वा नसेलही "..
सरळ आहे ती हरली होती ...!!
तर्क -भाव -विचार-विकार सारे वापरून थकली होती..
देव सापडला नाही ...तिला ...!!
.


माझ्या निराश शून्य देहाला ..
.तेंव्हाच अलगद काही कळले ...
..उजेड़ाचे असीम काहूर ..
मनामधे तेंव्हाच उठले ..


जुने सारे गर्व माझे एक क्षणात सरून गेले ...
विभ्रमांचे पाश तुटता ..आत्म रंग दीसून आले ..!!


सहस्त्र मायापंखांखाली ...विकारांच्या  चक्रां -खाली ..
देव स्वये उभा आहे...!!
कळले मला माझ्यामधेच ईश्वराची प्रभा आहे..! .........written by -HARSHAL *

Saturday, August 13, 2011

तो...भाग ३

   संध्या काळ शांत पणे सरत होती...........एकेक किरण एकेक  रंग विरत होते..काळ्याशार आकाशामध्ये..!..  तो मात्र तसाच ...सुन्नपणे उभा होता लांबवर पाहत ....नदीच्या चमचमत्या ;आणि मधेच अलगद उसळणार्या जल पात्राकडे निरखून पाहत ..किती वेळ झालाय ..नदीच्या पात्राचा रंग मघाशी उजळ ;निळा होता ....आत्ता तो
     . धुरकट राखाडी होत चाललाय ....सावकाश !! पण नजर हटत नाही..आपण ही नदी इतकी मनापासून का पाहतोय ..ह्याचे उत्तर सुद्धा नाहीये त्याच्याजवळ......ती संथ नदी ..तसेच आपण...तसेच रंग बदलणारे ,,पण
      रंग नदीने बदलले कि आकाशाने ..???..नदी तशीच आहे..पण  पाहणार्याला वाटावे कि तिनेच रंग बदलले ..
 ..आपणही तसेच आहोत ....फक्त परिस्थितीने रंग बदलले...आणि बाजूच्यांना वाटले कि ह्यानेच रंग
  पालटले..........असो........!!..कदाचित म्हणून ही नदी जवळची वाटते ....तीही आपल्या सारखीच  ...!!

एक सहज कविता आठवून गेली.........आपणच लिहिली होती नाही....??..हो ..असे विचार येतायत ..तोवर त्याला त्या ओळी दिसल्या देखील मनासमोर...अगदी नदीसारख्या स्वच्छ ...


"" तुझे स्वप्न नेत्रांत पाहून जगलो..
तुझे नाम श्वासांत राखून जगलो..!!
तुझे ध्यान आहे अजुनी मनाला..!!
तुझ्यावीण आयुष्य वाहून थकलो..!!,""


....................त्याला आठवले ...आणि परत तो शांत पणे समोरच्या जल पात्रासारखा वाहत गेला......मनातल्या मनातच...पण फार खोल आणि लांबवर....संध्याकाळ सरून गेली होती ..आणि दाट ;घट्ट रात्रीचा शेला विणला जात होता ..सावकाश ..त्याच्याभोवती ...मनाभोवती..!!


...............तो आणि ती ...भाग ३ .....[काल्पनिक ]...लेखन -हर्षल























Sunday, June 5, 2011

अधांतर ...!!

अश्रूंत रोजचा भिजतो ..
एकेक  दाह अंगाचा ..
ओसंडूनी वाहत जातो..
उद्वेग उग्र विजनाचा ...!!

सरताना सरुनी गेले..
आवेग मग्न विषयांचे..
पाठीस राहिला आता..
अस्वस्थ घोर शापांचा ....!!

जगताना कळले नाही 
सामर्थ्य शुद्ध सत्याचे 
उरला असत्य सारा 
हृदयात द्रोह सत्याचा !! 








Monday, May 30, 2011

तो

तो : कितीतरी वेळ असाच जात राहतोय ...सगळे समोर असून काहीच नसल्याचा भास ..तोही वाढतोय..!!
      
आजवर अशी वेळ का नाही आली..??....तू समोर आहेस आणि मी स्पष्ट बोलतोय...मन मोकळे,...अशी वेळ !!
      
आज मुद्दाम इथे आलोय ...त्या जुन्या गेट जवळ ....मागे एका जुनाट शाळेची मोठी पडकी इमारत ...आजूबाजूला शांत रस्ते....तुला लक्षात असेल ....अनेक वर्षे झाली त्याला .....अन जागा हीच...गम्मत आहे नाही!!...जागा संदर्भ कशा बदलतात...कळत नाही...!!....त्या वेळी आपण बोलत नसू ......पण एकत्र होतो.....दोघानाही काय कळत होते देव जाणे...पण एकत्र होतो...आज बोलणेही नाही आणि ..एकत्रही नाही.....सगळाच आनंद आहे..!!..असो..
 .........तू ऐकत असशील माझे स्वगत तर ...समजून घेऊ शकतेस ....तुझ्यासाठी मी थांबलोय अजून .....अन तुझ्याकडून उत्तर नाहीये काहीच.........अस ऐकलय एकाकडून कि फार बिझी असतेस आजकाल.....!!...आठवणी  कुरवाळायला वेळ नसेल...तुला...आणि आपल्या फारशा आठवणी आहेत कुठे ??...नाही म्हणायला एखाद दोन ....!!पण त्या तरी "तुला" लक्षात आहेत कि नाही मला माहित नाही...!!मला वाटलं जशा माझ्या भावना आहेत तशा तुझ्याही असतील.....भ्रमात होतो बहुदा..!!...आपोआप कळेल तुला अस वाटायचं !!.....पण वर्षांचे आणि वयांचे नुसतेच मोजमाप वाढत गेले......आपल्यातले अंतर वाढवत...अधिकाधिक !!.............आता ही अंतरे मिटतील असे आशावाद मला झेपत नाहीत....!!..तुझ्या जगाचे रुपांतर सुंदर उमललेल्या फुलांत झाले असेल ...[आणि तसेच व्हावे असे मलाही वाटते]....आयुष्याला सुंदर परिमाणे  मिळाली असतील ...तू सुखी असशील ...!!..कदाचित माझे नावसुद्धा तुझ्या या सुंदर आयुष्याला शोभणार नाही...एखादे दुसरेच नाव ..कुणाचे तरी  मिळाले असेल त्याला !!........फक्त एकच इच्छा आहे......
चुकून माकून कधी भेटलीसच  ...भविष्यात वाटेवर ...तर ..थोडीशी तरी ओळख दाखव..!!..बस..तेवढे प्रेम तरी नक्कीच केले मी तुझ्यावर........!!

........हर्षल .....[लेख...ती आणि तो..काल्पनिक]

Wednesday, April 27, 2011

पूर्वरंग




काय हरवले कळत नाही..
काय निसटले दिसत नाही...
पावलान्खाल्ची वाट कधी हरवून गेली सुचत नाही/...
ओळखीचेच जुने चेहरे ,अवचित नवे नवे दिसती..
परिचितांचे जुनेच थवे,नवीन रूपे घेऊन हसती...

प्रेम ते जुनेच तरी ..जुना त्यात रंग  नाही..
किती झरती अश्रू  तरीही ...पूर्वीचा तो संग नाही..

सायंकाळी पूर्वीसुद्धा नियमानुसार येतच होत्या..
काळीज कापत अनाम  हुरहूर रोज आत भरत होत्या..
आज सुद्धा सांज येते  ..दिवस सरला सांगून जाते..
पण याशिवाय वेगळे काही पूर्वीसारखे बोलत नाही ...
एकसुद्धा विश्रांतीचा कुठे विसावा देत नाही..

स्वप्ने पूर्वी रात्रभर नवे काही सांगत होती..
पहाटेच्या थंड वेळी डोळ्यांवरून स्मरत होती..
दिवस तेंव्हा स्वप्नासारखे हसत नाचत सरत होते..
रोज रात्री नकळत नवीन स्वप्न देऊन सरत होते..

आज निद्रा खूप येते ..स्वप्ने मात्र येत नाहीत..
काळोखाचा भार  सारा..कवडसाही शिरत नाही..
मनामधले सल सारे ..दिवसभर छळून जातात..
रात्र होते अंधाराची ...स्वप्ने त्यात जळून जातात ...

आधाराचे जुने हात आज पुन्हा शोधतो आहे...
उधाणलेल्या गलबताला किनारयाशी ओढतो आहे.
किनारा जुना फार दूर ..एक दिवस नक्की दिसेल...
जुने सारे भान पुन्हा मनामध्ये नक्की वसेल............!!
.................................................................................हर्षल@@.........२७अ ११





Wednesday, January 12, 2011

सत्य आणि असत्य

"सत्य "ही अत्यंत चमत्कारिक आणि तितकीच प्रभावशाली वस्तु आहे... !!
म्हणुनच "सत्य" हे अत्यंत सावध विवेकाने प्रसारित करायला हवे...!!
असत्य म्हणजे दुसरे तीसरे काही नसून ........स्थान-भ्रष्ट झालेले सत्य होय..!!

अर्थात ;असत्याला सत्याशिवाय अस्तित्व कधीच नसते....!!

[एक सोपे उदाहरण ::--खालील  विधाने  वाचा 
  "माणसाला दोन पाय असतात .....१]
  "घोड्याला चार पाय असतात....२]
वरील दोन्ही विधाने "सत्य"आहेत...

आता सत्याला स्थान -भ्रष्ट करुयात ...............खालील वीधाने वाचा ;
"माणसाला चार पाय  असतात ........१]
"घोड्याला दोन पाय असतात.......२]
]............ही असत्य वीधाने ठरतात .....परन्तु हां बदल नक्की कसा झाला?? ....तर केवळ सत्याचे स्थान  बदलल्याने ..बस्स!

असत्य हे असेच निर्माण होते...सत्य जागा बदलते तेंव्हा...!! ..सर्वत्र!!
.........................................................हर्षल देशपांडे ...१२ज ११

Saturday, January 1, 2011

दैवते ........[An extract from my writings]........

अजुन रात्रींचे पडदे अदृश्य चित्रांचे भास् ;चमत्कारिक कलाकृती ;निर्माण करताहेत...!!  
सत्य अजुन धुक्यातच आहे ...
संध्याकाळ आज सुद्धा ;अस्वस्थ करते...
अजब आहे सारे ...नाही का?..

दूर वाटांवर अजुन चाहुल लागते कुठेतरी...
आजुबाजुचे लोक मला सांगतात..."भास् आहे रे हां.".
"अंधार पडला की असे भास् होतात..."..अरे शुद्धीत असलेल्या माणसाला सुद्धा भ्रम होतो रे..मग तू तर काय ...."
आणि ते शांत होतात ...त्यांचे अर्धवट वाक्य "मग तू तर काय ...वेडाच!!.."..मी मनातल्या मनात पूर्ण करतो..!!

जग मस्त आहे .नाही  .!!..निरुत्तर प्रश्नाची हकालपट्टी करायला एकदम तैयार...always ..ready !! ..
शंकराचार्य म्हणतात "सारे जगच मिथ्या आहे.."...आणि  जग म्हणते;.."जे दिसते ;आम्हाला तेच खरे "..'यातला 
"आम्हाला" हां शब्द महत्वाचा आहे ;याचे भान नसते त्यांना,,,!!..जाऊ दे..माझ्यासारख्या मूर्खाचे अकलेचे बोल का मानाल तुम्ही..??...तुम्ही पण त्यातलेच ना...!!..म्हणजे .शहाणे !!

मी रागावून बोलत नाहिये .!!राग ;द्वेष;मत्सर; वासना ;स्वार्थ;मत्सर ...[खोटे  वाटेल तुम्हाला ]..पण माझ्यात नाहिये..!!
हेच कारण असेल की ;लोक मला "वेडा"म्हणतात ....असे जर असेल तर भाग्यवान आहे मी..
...फार मोठ्या लोंकांच्या यादीत बसेन मी...
संतांच्या ;प्रेशीतान्च्या ;महंतान्च्या...
सांसारिक लोकांच्या [अल्प]बुद्धी प्रमाणे ..हे सारे अत्यंत वेडे होतेच .
तुकारामांना संसार नाही जमला...रामदासान्ना तर तो नव्ताच..
एक्नाथान्पासून ..गोरा कुम्भारापर्यंत ...सारे अगदी कट्टर ..स्वार्थ वीरहीत..आसक्ती विरहीत..!!
...लोक त्यांचे "लाजे खातर "उत्सव" करतील...प्रपंचात मीठभर परमार्थ म्हणून...!!
पण स्वत मात्र काडीमात्र बदलायचे नाहीत...
मी सांगीतले ना ;ज्यांना आपण खरच मानतो...त्यांचे आपण ऐकतो..जीव लावून...!!....लोक त्यांना पुस्तकातून पाहतात...समाज म्हणतो म्हणून नमस्कार करतात..पण त्यांना "सत्य"म्हणून स्वीकारू शकत  नाहीत...!!...[इतके सोपे नाही ते...आस लागते ;नशीब लागते त्याला..असो]

 लोकांची खरी दैवते भलतीच असतात.!...त्यांची..त्या देवतांची  मंदीरे नसतात ..टोलेजंग..!!
नसतात उपास तापास !! ....काडीमात्र  बंधने नसतात...त्यांना !
पण ही दैवते भयंकर ..सर्वत्र ..अंतर्बाह्य पसरलेली असतात...[सर्व व्यापी...अगदी शब्दश:]
अहोरात्र त्यांचीच पूजा होत असते...लोक्मान्सातून...!!
ह्या अहर्निश भक्तीच्या उन्मत्त शक्तीने..ही देवतांची फौज नवीन नवीन 
वरदानान्ची खैरात करत असते...!!..आपल्या अबोध भक्तांवर..!!..
अक्खे जग त्यांचे भक्त..सारी माणसे त्यांची अनुरक्त ..!!
...".ह्या " देवतांना शरण न जाणारेसुद्धा  ....असतात !!..पण ..अगदी ..म्हणजे अगदीच थोड़े..एखाद दुसरा . कोट्यवधीन्मधे..!!
ते जाणतात ..ह्या देवांचे थोटेपण..खोटे पण ......"ते" नकार देतात ह्या देवांना "खरे"देव म्हणायला ....
."ते" नाव देतात या देवांना "षड-वीकारांचे ".!!.......आणि सांगतात सम्पूर्ण जगाला ...."त्यांच्या" असत्याचे "भीषण "सत्य ...आणि ब्रह्म सत्याचे वास्तव...!!
...अगदी कंठ शोष करून..!!....
.जगातले काही जागतात सुद्धा या शब्दानी...
..पण अखेरीस काय ...निष्पन्न   ??.....
मी सुरुवातीलाच म्हंटले ना..!!
"ही वीकारांची दैवते फार फार भयंकर असतात.."......
त्यांचे गुलाम भक्त त्यांना सोडणार नाहीत अशी कड़क सोय करतातच ते...!!
आणि मग??....मग काय ..."संतांची ; दार्शनीकान्ची..; धिंड निघते .."प्रथम लोकांच्या मनातून ;नंतर समाजातून..!!"
.....अर्थात ...समाजाला समजत नाही .....सत्याची आवश्यकता "त्यांना"आहे..संतांना नव्हे..!!...!!

-------------------------------------------------------हर्षल १\१\११.......

Friday, December 24, 2010

An extract .from ."THE ETERNAL DUAL ..".....of my writings...!!

it would be  too early.........he thought.....about asking her.. 

when he was very near......nearer to her.......as both of them ...too unknown to each other..that time!!


then there were times ........he could have talked to her...atleast....!!


as they had ...atleast by then known to each other......to some extent..!!!
 
but he just let moments freely to be wasted...couldnt get nearer to her ....!.not by a single chance!!


times passed away......
.while passing as always time does...it marked their past AND carved on them the maturity.;increased their age....!!....
one more thing  the time somehow managed;very precisely;.....it PARTED them............totally seperated...differentiated.....!!


now was the problem for him....!!......she went without any relation ....HE remained with a specificationless AFFECTION.......unknown ....unsupported .......unacknowledged ....!!


""TIME has PLAYED foul games "" he used to think when he used to be in silent moments with himself ..thinking of HER and his own miserable life...!!


not only THE TIME had  removed his beloved to a far remote and unapproachable distance ;but also had scratched  HIS life by indeterminate and unsolved questions of stubborn and darkest destiny! HE couldnt  SOLVE them...the unwise dreadful questions..!!........
he fought with them as he could ....but doesnt know whether he won a bit or instead lost the whole essence of  his life [which once was so aspiring ..and demanding]...!!
 
......now someday he settles down at a lonely place......looks at completely changed himself....as if transformed from a golden object to some cast iron shineless thing ......feels awkward to look at himself....to recognize himself.......and suddenly HE remembers HER.........he sinks too deep inside the memories of her ........................

HE knows SHE LIVES STILL somewhere to a reachable distance by a vehicle......HE CAN SEE her smile IF he pursues her ....HE can even see her if he forcefully intends and tries to do so.......
.................BUT ....NO...!!....HE  knows well .....NOW it is not the matter of physical distance between them.....Which SEPARATES them.....but the LIVES of them have had been truly  and vigorously bifurcated ... ..they are not supposed to be united ...or mended together .................!!!



""IT  IS TOO LATE...""...........!!....HE SAYS TO HIMSELF AND THE IMAGE OF HER IN HIS HEART                            


 written by harshal
                           from his writings  
                           "the eternal dual"


........... 

Sunday, December 19, 2010

expressions for TRUTH...............!!

it is not the things we decide .......
but it is  the things who decide .......

what to flourish ,,,.......and when..!!
that all makes "DESTINY"..........!

THE power to strive is the outcome  of what we intake ....when we remain powerless..

  • it is the strength ..yet unknown to us whether it just depends upon the circumstances we are presented to overcome...or the instinct ...or the succession that already has been captivated by the soul during the birth of us..!!.....the prominent thing among this is that the ways of life are so scientifically arranged ..based on the minuscule fine laws though apparently unseen;but omnipresent and rigid enough to bind the events in all respects ...this extremely interlinked pre-maintained synopsis is out of bound of what is generally known as "philosophy of life"....................
 as we must understand ;the philosophical limits are not the real limits of philosophy as we many times presume;but they are the "relative  in capabilities" of the  humans who do not recognize the acute and inseparable unity in the universe; before propounding so called "philosophical "theories!!!............ 
....................................by''harshal deshpande"......................18d10

तुझ्यावीण...................................!!!!!!!

कधी वाटते चन्द्र होउन यावे..
तुझ्या दिव्य रूपावरी  पाझरावे..
तुझे नेत्र मिटता..हलुवार तेथे ..
तुझ्या शांत  निद्रेतूनी .स्वप्न व्हावे..


तुझे श्वास ते सौम्य ;झूलता  जरासे
तुझे ओठ निशब्द ;हलता जरासे ;
तुझे भाव अव्यक्त समजून घ्यावे;
तुझे नाव हृदयात ऐसे वसावे..!


पसरला सभोती दिशांचा पसारा..
पसरला जगाचा असा खेळ सारा..
तरी त्यात माझे नसे चित्त काही..
तुझ्यावीण ते सौख्य येणार नाही..
 इथे मानवान्च्या महाभव्य जत्रा
क्षणांच्या सुखाच्या बहुरंग यात्रा;
 तरी त्यात  नाही सुखाचा निवारा..


तुझ्यावीण हां जन्म निर्जीव सारा.......!!


हर्षल ............१८डी १०