Saturday, July 20, 2013


सरती सुखे नि दु:खे …. सुटतात संग सारे …. उरतात संगतीला गतकाळ वैभवांचे …। 
आयुष्य पुष्प जाते …हळुवार ते मिटूनी …… स्मृतींमधून उरती आनंद यौवनांचे …।...written by HARSHAL
meaning.." all of joy and sorrow diminish ..and everything belonging to us leaves us...
and what remains is the beutiful earnings in  Past......the flower of LIFE ..closes and dies slowly...
and left with us is the memories of young blossoming life..."......

Wednesday, June 19, 2013

ऐ जिंदगी .......

पता नहीं था ...तेरे खातिर … इतना आलम सहना होगा ..
अपनाही  ग़म ..आँखों देखा ..हँसते  हँसते सहना होगा ।

जगण्यासाठी


जगण्यासाठी प्यावे लागेल ,इतके  विष … 
….  माहित नव्हते … 
इतके वळतील रस्ते अवघड … 
खरच तेंव्हा ठाऊक नव्ह्ते…।

आकांक्षेंचे लांब तन्तू
नाजूक धरून जावे लागेल… 
 मधेच गेले जरी तुटून … 
जगणे वाहत न्यावेच लागेल… 

आशा सुंदर काचेसारखी… 
 मधेच जाता तडकून पार … 
उसासलेले काळीज घेऊन … 
नाही होता येत पसार… 

सगळे दु:ख हसत राहून 
पहावे  लागेल………। 
…………। माहित नव्ह्ते…।!!
 इतके वळतील रस्ते अवघड … 
खरच तेंव्हा ठाऊक नव्ह्ते…। .------------------------------------------------अपूर्ण … .लेखन---------- हर्षल

Sunday, June 16, 2013

वर्षारंभ


आता पुन्हा मेघांचे स्वर …. 
अस्मानातून घुमतील । 
सूर्य पुन्हा अखंड झाकून … 
पृथ्वीवर फिरतील … 

आता पुन्हा समुद्रांचे 
काळीज येईल भरून     
आता पुन्हा वादळांचे 
नाद येतील दुरून ।

तापलेले जमीन खंड 
थंड थंड होतील … 
उन्हाळलेले रानझरे..
पुर्नजन्म घेतील …. 

इंद्र वज्र उग्र पुन्हा
कडाडेल वरती
अंबरात जाळ उठे 
मेघ ते वितळती …. 

पुन्हा मत्त वायू भार 
घेउनी मृद-गंध सार 
उधळूनिया  दाही दिशी 
अवचित होतील पसार…

हरित रंग बहरतील 
इंद्रधनू उमलतील 
काळजात खोल नवे 
प्रीत श्वास जन्मतील … 

बरसता उधाण वृष्टी 
मेघ गर्जता वरि… 
थंड वात वाहताच … 
मुग्ध त्यावरी ….

पुन्हा सखे ,तुझ्या स्मृती 
मला  भारतील… 
तुझे  शब्द ,तुझे स्पर्श… 
पुन्हा जागतील …। 

------------------------------------------------------------ written by ....-- HARSHAL .-------------------------------------------

Saturday, May 25, 2013


वीर हो सदैव तुम धीर हो सदैव तुम

राष्ट्र का महान जय शौर्य धैर्य श्वास तुम…

विश्व मैं महान है भारतीय भूमिका

पवित्रता उसीकी हो विशेष भाग्यवान तुम

धर्म हो विचार हो घोरता पे वार हो

दंड हो प्रचंड हो सत्य का प्रकाश तुम

तेज सूर्य का भरो सत्य कृष्ण का स्मरो

अखंड हिंदभूमि का बनो सदा दिमाख तुम।

Wednesday, May 8, 2013


in 1857 freedom war of india ...a britisher asked bahadurshah jafar ,king of delhi that time ..

दम -दमे में दम नहीं ...

अब खैर मांगो जान की ....

ऐ  जफ़र ठंडी हुई ..

शमशेर हिन्दुस्तान कि… !!

 "" your freedom fight or mutiny
is useless ....
you are being defeatedby england army ..
now leave dreams of victory aside ..
but prey for your lives..beg for lives..!!
o great king jafar ...the sword of india has lost its bravery !! """"

the king zafar replied .....


गाज़ियों में बू रहेगी ...

जब तलक ईमान की ...

तब तो लंदन तक चलेगी ....

तेग हिन्दुस्तान कि….!!

" till the brave warriors of hindustaan
 have faith and trust on their country
then till that there is no defeat ..
the sword of hindustaan will
fight even upto  your london...""...........................
  
--------  FOR 25 th ANNIVERSARY --------

" स्मरण आज हे शुभ समयाचे
     पंचविसाव्या लग्नदिनाचे 
     अखंड असू दे भाग्य जीवनी 
     सौख्य मिळू दे शुभ प्रेमाचे   ….!!

 आपुले जीवन कठीण होते 
प्रयत्न केले अनेक तेंव्हा 
आणि बनविले घरकुल सुंदर 
मान आजचा लाभे तुम्हा ….!!

   पत्नी आणि पती ,दोन ही 
  संसाराची असती चाके 
  दोघे  अनुरूप असती तेंव्हा 
 तुमच्यासम संसार  लकाके ……!!

तुमचे जीवन प्रयत्न 
आणि देव दयेचे सुंदर मिलन 
तुमचे विवाह मिलन म्हणजे 
जणू विष्णू - लक्ष्मीचे मिलन ….!!

       लग्न सांधते दोन मनांचा 
       परस्परांशी  संगम अभिनव … 
    तुमची जोडी पाहून येतो 
        या शब्दांचा आम्हा अनुभव…. !!

लग्न होऊनी वर्षे गेली 
पंचवीसाच्यावरी आज ही 
तरीही आहे अजून प्रीती 
तशीच सुंदर पूर्वीसारखी …!!
                  
एकच अमुची आहे आशा ,एक शुभेच्छा,
                    पूर्ण होऊ दे तुम्हा मनातील सार्या  ईछा. 
                    एकच अमुचे देवाजवळी असे मागणे 
                    असेच तुम्हा सदैव त्याने सुखी ठेवणे …!!
 ------------------------------------------------------हर्षल  7 /5 /2 0 1 3 
 

Sunday, February 24, 2013

ॐ  
यो जानाति चतुर्वेदान स: वै जानाति जगत्पतिम !
न विद्यते वेद्तुल्यं अन्य शास्त्रम् इति स्मृतः !!
--------------------------------------------------harshal 

" THE ONE WHO UNDERSTANDS AND EXPERIENCES 
FOUR VEDAS ;HE KNOWS THE ONLY OMNIPRESENT CREATOR OF THE UNIVERSE!!
 THERE IS NEIGHTER A SCRIPTURE OR ANY BOOK OR ANYTHING IN THE WORLD
THAT CAN BE COMPARED WITH THE VEDAS..AND THIS IS AN ETERNAL TRUTH !!"

Sunday, January 20, 2013

सुसंगती सदा घडो ! सुजनवाक्य कानी पडो !!
कलंक मतिचा झडो ! विषय सर्वथा नावडो !!      
meaning 
" may we always possess the noble companionship 
may we hear always the gentle and noble things 
may the bad patches on our intellect be washed off 
and may we always dislike lust and filth !"
 

Tuesday, December 4, 2012

मुक्तचिंतन ..3

आयुष्य एखाद्या उन्मत्त जनावरासारखे ...भीती आणि चिंतांची राक्षसी शिंगे उगारत चाललय ...

एकेक क्षण तुफान वेगाने आपल्याला भेटतो  आणि आपल्या आतून आरपार निघून जातो भूतकाळाच्या अजस्त्र असंबद्ध जाणीवेत .....

कालचे आज नाही आणि आजचे उद्या नाही.....

तरीही भविष्याची चिंताक्रांत ओझी  वाहतोय आम्ही...!!

आनंद आणि उल्हास  खरच आपण अनुभवतो का..??....फक्त त्याची वर्णने वाचतो आपण...कल्पनेतच सगळे जगतोय..!!

स्वप्नांसारखे चांगले आणि वाईट दुसरे काही नाही.......

कारण हीच स्वप्ने भयंकर आशा आणि अशक्यप्राय गोष्टी दाखवतात ......मनाला भुरळ पाडतात ....आणि नन्तर स्वप्नांची नशा चढलेल्या मनाला पुन्हा वास्तवाच्या भूमीवर उतरणे ;चालणे अवघड करून टाकतात..........

जगण्याची एक स्तिमित करणारी गोष्ट   म्हणजे ते माणसाला जिवंत ठेवते.....अगदी किमान तशी आशा मात्र नेहेमीच राखून ठेवते..."
"कितीएक ते ते जन्मले आणि मेले "....असे जरी प्रत्येकाला समजत असते तरी तो स्वतः मात्र "घातला अमरत्वाचा पट्टा "..अशा थाटात हिंडत असतो....पाप पुण्याचे हिशेब लावत जगत असतो..!!.........

आसक्ती आणि अभिलाषा ह्या दोन जुळ्या भगिनी ...माणसाला किती फिरवतील ते काही सांगता यायच नाही.......

ही अफाट माया ..सर्वत्र वेटोळे घालून बसलेली ...तिला पार नाही ..आदि नाही ....अंत नाही.....वर्तुळाला  अंत असतो का कधी..!!

तेच आयुष्य ...ह्या महामायेने उत्पन्न केलेले !!......

जेंव्हा ह्या "मायेच्या ",,पार बघण्याची दृष्टी येते ..तेंव्हा जाग येते......आणि कळतो हा भीषण पण अजाण खेळ...!!

परमेश्वर ह्या सगळ्यांना सोडून पार दूर उभा आहे.....

ही मुक्तता केवळ त्याचीच आणि हे जीवन बंध सुद्धा त्याचेच,......

भेद  इतकाच कि;  मायेच्या तावडीत असताना तुम्ही परमेश्वराला जाणू शकत नाही.....

आणि मायेच्या विळख्यातून मोकळे झालात कि "परमेश्वराशिवाय " अन्य काहीच पाहण्यासारखे उरत नाही..!!!!

पण हे सगळे  समजणे आणि तसे घडणे ..हे फार अवघड आहे....अत्यंत अत्यंत अवघड.....!!!

------------======================================= लेखन - हर्षल ................. { मुक्तचिंतन ३]

Saturday, November 17, 2012


तो आणि ती ...अंतिम चरण भाग १ !!



..संध्याकाळची शांत वेळ ....सूर्य  जवळपास विझलेलाच  असावा......कारण आकाश ;भगव्या रंगाचे धूसर पटटे उगाच काळपट अंगावर रंगवीत ढगांना इकडे तिकडे फिरवत आरामात पहुडले होते..........मधूनच पक्षांचे थवेच्या थवे क्षणभरासाठी आकाशाच्या शांततेचा भंग करत एक पल्लेदार रांगोळी ढगांवर चितारत वेगाने आसमंत  ओलांडून लांबवर पळत होते...............
............ही कातर वेळ ............हा एक विनाकारण मनाचे ताल बिघडवणारा अशांत शांतपणा ......................!!.
...............गर्दीपासून दूर " तो " आडवाटेवर ...शहराच्या बाहेर हिंडतोय..................
 निष्कारण हिंडताना वाटणारी मजा ..आज मात्र नाहीये.....!!.......शहराबाहेरच्या बकाल वस्त्या कधीच मागे गेल्यात ....हायवे वरून पुढे येत उजवीकडे सरळ आत जाणारी त्याची परिचित लांब आणि निर्मनुष्य वाट त्याने निवड्लीये .........आजूबाजूला फक्त चमकणारे तुरळक दिवे..त्याच्या बाईक चा धडधडणारा आवाज ...एवढीच साथ पुरेशी आहे त्याला ..................!!...........
............................गाडीचे गिअर न्यूट्रल वर येतात ....ब्रेक करकचून दाबला जातो.....बाईक थांबते.....!!................समोर त्याचे आवडते ठिकाण आलेले आहे......भयंकर दुखाच्या वेळी ;संताप किंवा शोक अनावर होण्याच्या वेळी "तो " इथेच येतो...नेहेमी...!!....समोर एक साधा लहान ओढा आहे .....दोन काठ असलेला ....उथळ परंतु  वळणा -वळणाने वाहणारा....आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे निर्मनुष्य ...!!...लांबवरचे प्रकाश तिथल्या हवेत सूक्ष्मपणे तरळत असतात...चंद्राचे शांत चांदणे कधी वाहत्या पाण्यावर अलगद वाहत उभे असते....आजूबाजूला थंड..शांत मोकळेपणा ....डोक्यावर अंतरिक्षाचा नक्षत्र नकाशा ..आणि दहा दिशांना घट्ट  अंधारातून उगवलेला थंड प्रकाश ...जुनी झाडे आणि बारीक झुडुपे ... ..बास्स ...अजून काहीही नाही.....!!!...........आणि हो.. एक गोष्ट अजून तिथे अगदी उघड होते..स्वच्छपणे .ते म्हणजे .." त्या "चे स्वत:चे मन ......!!....बाकीची सृष्टी ;त्यातले कोलाहल सारे काही  त्या वातावरणात जेंव्हा  मिटून जाते ...तेंव्हा  त्याचे मन आतल्या आतून ज्वालेसारखे  फुलून येते...उमलते....स्वतःबरोबर सगळी दु:खे घेऊन...मनाच्या तळातला सगळा सगळा विखार घेत........जगताना दडवून  ठेवलेला समस्त अंगार घेत.......!!.............पण आज परिस्थिती निराळी आहे.....आवाक्याबाहेर गेलेली आहे....!!..........
              आज ...मनाचे भान अदृश्य झालेय....नेहेमी इथे आल्यावर वाटते तशी आग आज वाटतच नाहीये... !!....." तो " एखाद्या सुन्न वठलेल्या वृक्षासारखा निश्चल झालाय.............यंत्रासारखा .....!!...यंत्र..??..हो .यंत्रच..!!..दुसर्यानी कऴ दाबली कि सुरु होणारे ;दुसर्या कुणाच्या तरी मेहेरबानीवर धडधडणारे...आणि बंद देखील दुसर्यामुळे होणारे...  !!..त्याला वाटले "सगळे असेच चालले आहे....आपण वापरले गेलो...गुंतलो आणि फसलो..काळजा वरचे हे डाग धुवून टाकणे काही जमले नाही..जमणार ही नाही...!!".......आता थंड हृदयात जाळ  पेटू  लागला होता .......
....................................अलगद उतरत जाणारी संध्याकाळ आता भेसूर रात्रीचा गडद अंधार घेऊन एखाद्या राक्षसी सारखी विक्राळ बनू लागली होती...आजूबाजूचे प्रकाश तिच्या मगरमिठीतून सुटलेच तर थोडेफार वातावरणात चमकत होते...अंधकार चांगलाच वयात आलेला होता..!!..ओढ्याची तिरपी वळणे आकाशाचा फिकट हलता नकाशा स्वतावर खेळवत मिस्कील आवाज करत सळसळत होती......आणि " तो " ..या सगळ्या अमानवी दृश्यांमध्ये कैद झालेला एक अतृप्त मानव.....स्थिर ..निश्चल ..अस्वस्थ ..!!!
 ..............................ईतक्यात लांबून कुठूनसा आवाज उमटला ..."  झाडाच्या फांद्यांवर कुणी पक्षी ओरडला असेल ...""  त्याला वाटले...!!.....आणि त्याची तंद्री मोडली...सगळे दुखाचे कढ एकदम उचंबळून आले...अंधारात जीव घेऊन ओरडावेसे वाटले..काळजाची एकेक तार खेचून त्यावर सर्वात उग्र दु:खाचे संगीत झन्कारावेसे वाटले....वाटले..सगळे पुन्हा सुधारता येईल...सगळे पुन्हा दुरुस्त होईल..!...........हे आजूबाजूचे रान माझी साथ देईल...हा निसर्ग माझा आहे...ही रात्र मला उद्या सुखाची पहाट दाखवेल ....!!........या भयंकर एकांताला ..माझे अश्रू ;माझे 
जळणारे अंतकरण समजेल...........बधीर करणारे सत्य बदलून जाईल................"ती" माझी होईल.........!!
 ....................................."ती "...तिला माहितसुद्धा नसेल मी असा हिंडतोय......फिकीर नाहीये तिला...जमदग्नी सारखा तप्त झालेला माझा अंतरात्मा तिला साधा जाणवत देखील नसेल.......... फिरत असेल ती तिच्या स्वप्नाच्या तृप्त प्रदेशात ;तिच्या उज्ज्वल भविष्याच्या रंजक जगात ..
...........................उगाच तिच्यावर जीव लावला......कापरासारखा काळ उडवला तिच्यासाठी .........शेवटी तिचा एक प्रेमळ शब्द देखील ऐकला नाही.....आणि पदरात पडली ती घोर उपेक्षा आणि धिक्कार..!!..............."".
.......................... "आता ती निघून जाईल नवीन संसार सुरु करायला तिच्या आवडत्या जोडीदाराबरोबर ..कायमची...आणि मी सगळ्या स्वप्नांचे धुळीला मिळालेले लक्तर नशिबात  घेऊन बसेन भूतासारखा.............भूते फार विचित्र असतात ..ती स्वताला जन्मोजन्मीची शिक्षा करतात .....""
...................................तो पाठीत वाकला होता ...दु:खाने  थरथरत होता ....सगळे शांत ;नीरव ..मस्तकातून कळ उठत होती...मुठी आवळल्या  होत्या ..श्वास घेण्याचे सुद्धा भान नव्हते ...शांत ओढ्याजवळ क्षणाक्षणाला  असह्य वेदनांचे भयंकर ओझे मनात भरत होते....त्या ताणाखाली तो पार खचत होता ..अगदी मोडून पडेल इतका झुकून गेला होता..........थकून गेला होता ....!!
......................जवळच्याच एका झाडावर पारध्याने लावलेल्या फासात दिवसभर तडफडत  बसलेला कोणी पक्षी अखेरची अस्फुट किंकाळी देत मरणपंथाला लागलेला होता............
..........................रात्र  सगळ्या बाजूंनी  अस्वस्थ अंधार ओतत होती......खूप उशीर झालेला होता..................................!!!




                                                                  ========= ====     तो आणि ती  या माझ्या लेखसंग्रहातून .................... हर्षल.....................


विशेष सूचना :...लेख काल्पनिक असल्याने उगाच लेखकास नसते प्रश्न विचारू नयेत व आकांड -तांडव करू नये.....लेखक मजेत आहे...!!!.................