Sunday, June 5, 2011

अधांतर ...!!

अश्रूंत रोजचा भिजतो ..
एकेक  दाह अंगाचा ..
ओसंडूनी वाहत जातो..
उद्वेग उग्र विजनाचा ...!!

सरताना सरुनी गेले..
आवेग मग्न विषयांचे..
पाठीस राहिला आता..
अस्वस्थ घोर शापांचा ....!!

जगताना कळले नाही 
सामर्थ्य शुद्ध सत्याचे 
उरला असत्य सारा 
हृदयात द्रोह सत्याचा !! 








Monday, May 30, 2011

तो

तो : कितीतरी वेळ असाच जात राहतोय ...सगळे समोर असून काहीच नसल्याचा भास ..तोही वाढतोय..!!
      
आजवर अशी वेळ का नाही आली..??....तू समोर आहेस आणि मी स्पष्ट बोलतोय...मन मोकळे,...अशी वेळ !!
      
आज मुद्दाम इथे आलोय ...त्या जुन्या गेट जवळ ....मागे एका जुनाट शाळेची मोठी पडकी इमारत ...आजूबाजूला शांत रस्ते....तुला लक्षात असेल ....अनेक वर्षे झाली त्याला .....अन जागा हीच...गम्मत आहे नाही!!...जागा संदर्भ कशा बदलतात...कळत नाही...!!....त्या वेळी आपण बोलत नसू ......पण एकत्र होतो.....दोघानाही काय कळत होते देव जाणे...पण एकत्र होतो...आज बोलणेही नाही आणि ..एकत्रही नाही.....सगळाच आनंद आहे..!!..असो..
 .........तू ऐकत असशील माझे स्वगत तर ...समजून घेऊ शकतेस ....तुझ्यासाठी मी थांबलोय अजून .....अन तुझ्याकडून उत्तर नाहीये काहीच.........अस ऐकलय एकाकडून कि फार बिझी असतेस आजकाल.....!!...आठवणी  कुरवाळायला वेळ नसेल...तुला...आणि आपल्या फारशा आठवणी आहेत कुठे ??...नाही म्हणायला एखाद दोन ....!!पण त्या तरी "तुला" लक्षात आहेत कि नाही मला माहित नाही...!!मला वाटलं जशा माझ्या भावना आहेत तशा तुझ्याही असतील.....भ्रमात होतो बहुदा..!!...आपोआप कळेल तुला अस वाटायचं !!.....पण वर्षांचे आणि वयांचे नुसतेच मोजमाप वाढत गेले......आपल्यातले अंतर वाढवत...अधिकाधिक !!.............आता ही अंतरे मिटतील असे आशावाद मला झेपत नाहीत....!!..तुझ्या जगाचे रुपांतर सुंदर उमललेल्या फुलांत झाले असेल ...[आणि तसेच व्हावे असे मलाही वाटते]....आयुष्याला सुंदर परिमाणे  मिळाली असतील ...तू सुखी असशील ...!!..कदाचित माझे नावसुद्धा तुझ्या या सुंदर आयुष्याला शोभणार नाही...एखादे दुसरेच नाव ..कुणाचे तरी  मिळाले असेल त्याला !!........फक्त एकच इच्छा आहे......
चुकून माकून कधी भेटलीसच  ...भविष्यात वाटेवर ...तर ..थोडीशी तरी ओळख दाखव..!!..बस..तेवढे प्रेम तरी नक्कीच केले मी तुझ्यावर........!!

........हर्षल .....[लेख...ती आणि तो..काल्पनिक]

Wednesday, April 27, 2011

पूर्वरंग




काय हरवले कळत नाही..
काय निसटले दिसत नाही...
पावलान्खाल्ची वाट कधी हरवून गेली सुचत नाही/...
ओळखीचेच जुने चेहरे ,अवचित नवे नवे दिसती..
परिचितांचे जुनेच थवे,नवीन रूपे घेऊन हसती...

प्रेम ते जुनेच तरी ..जुना त्यात रंग  नाही..
किती झरती अश्रू  तरीही ...पूर्वीचा तो संग नाही..

सायंकाळी पूर्वीसुद्धा नियमानुसार येतच होत्या..
काळीज कापत अनाम  हुरहूर रोज आत भरत होत्या..
आज सुद्धा सांज येते  ..दिवस सरला सांगून जाते..
पण याशिवाय वेगळे काही पूर्वीसारखे बोलत नाही ...
एकसुद्धा विश्रांतीचा कुठे विसावा देत नाही..

स्वप्ने पूर्वी रात्रभर नवे काही सांगत होती..
पहाटेच्या थंड वेळी डोळ्यांवरून स्मरत होती..
दिवस तेंव्हा स्वप्नासारखे हसत नाचत सरत होते..
रोज रात्री नकळत नवीन स्वप्न देऊन सरत होते..

आज निद्रा खूप येते ..स्वप्ने मात्र येत नाहीत..
काळोखाचा भार  सारा..कवडसाही शिरत नाही..
मनामधले सल सारे ..दिवसभर छळून जातात..
रात्र होते अंधाराची ...स्वप्ने त्यात जळून जातात ...

आधाराचे जुने हात आज पुन्हा शोधतो आहे...
उधाणलेल्या गलबताला किनारयाशी ओढतो आहे.
किनारा जुना फार दूर ..एक दिवस नक्की दिसेल...
जुने सारे भान पुन्हा मनामध्ये नक्की वसेल............!!
.................................................................................हर्षल@@.........२७अ ११





Wednesday, January 12, 2011

सत्य आणि असत्य

"सत्य "ही अत्यंत चमत्कारिक आणि तितकीच प्रभावशाली वस्तु आहे... !!
म्हणुनच "सत्य" हे अत्यंत सावध विवेकाने प्रसारित करायला हवे...!!
असत्य म्हणजे दुसरे तीसरे काही नसून ........स्थान-भ्रष्ट झालेले सत्य होय..!!

अर्थात ;असत्याला सत्याशिवाय अस्तित्व कधीच नसते....!!

[एक सोपे उदाहरण ::--खालील  विधाने  वाचा 
  "माणसाला दोन पाय असतात .....१]
  "घोड्याला चार पाय असतात....२]
वरील दोन्ही विधाने "सत्य"आहेत...

आता सत्याला स्थान -भ्रष्ट करुयात ...............खालील वीधाने वाचा ;
"माणसाला चार पाय  असतात ........१]
"घोड्याला दोन पाय असतात.......२]
]............ही असत्य वीधाने ठरतात .....परन्तु हां बदल नक्की कसा झाला?? ....तर केवळ सत्याचे स्थान  बदलल्याने ..बस्स!

असत्य हे असेच निर्माण होते...सत्य जागा बदलते तेंव्हा...!! ..सर्वत्र!!
.........................................................हर्षल देशपांडे ...१२ज ११

Saturday, January 1, 2011

दैवते ........[An extract from my writings]........

अजुन रात्रींचे पडदे अदृश्य चित्रांचे भास् ;चमत्कारिक कलाकृती ;निर्माण करताहेत...!!  
सत्य अजुन धुक्यातच आहे ...
संध्याकाळ आज सुद्धा ;अस्वस्थ करते...
अजब आहे सारे ...नाही का?..

दूर वाटांवर अजुन चाहुल लागते कुठेतरी...
आजुबाजुचे लोक मला सांगतात..."भास् आहे रे हां.".
"अंधार पडला की असे भास् होतात..."..अरे शुद्धीत असलेल्या माणसाला सुद्धा भ्रम होतो रे..मग तू तर काय ...."
आणि ते शांत होतात ...त्यांचे अर्धवट वाक्य "मग तू तर काय ...वेडाच!!.."..मी मनातल्या मनात पूर्ण करतो..!!

जग मस्त आहे .नाही  .!!..निरुत्तर प्रश्नाची हकालपट्टी करायला एकदम तैयार...always ..ready !! ..
शंकराचार्य म्हणतात "सारे जगच मिथ्या आहे.."...आणि  जग म्हणते;.."जे दिसते ;आम्हाला तेच खरे "..'यातला 
"आम्हाला" हां शब्द महत्वाचा आहे ;याचे भान नसते त्यांना,,,!!..जाऊ दे..माझ्यासारख्या मूर्खाचे अकलेचे बोल का मानाल तुम्ही..??...तुम्ही पण त्यातलेच ना...!!..म्हणजे .शहाणे !!

मी रागावून बोलत नाहिये .!!राग ;द्वेष;मत्सर; वासना ;स्वार्थ;मत्सर ...[खोटे  वाटेल तुम्हाला ]..पण माझ्यात नाहिये..!!
हेच कारण असेल की ;लोक मला "वेडा"म्हणतात ....असे जर असेल तर भाग्यवान आहे मी..
...फार मोठ्या लोंकांच्या यादीत बसेन मी...
संतांच्या ;प्रेशीतान्च्या ;महंतान्च्या...
सांसारिक लोकांच्या [अल्प]बुद्धी प्रमाणे ..हे सारे अत्यंत वेडे होतेच .
तुकारामांना संसार नाही जमला...रामदासान्ना तर तो नव्ताच..
एक्नाथान्पासून ..गोरा कुम्भारापर्यंत ...सारे अगदी कट्टर ..स्वार्थ वीरहीत..आसक्ती विरहीत..!!
...लोक त्यांचे "लाजे खातर "उत्सव" करतील...प्रपंचात मीठभर परमार्थ म्हणून...!!
पण स्वत मात्र काडीमात्र बदलायचे नाहीत...
मी सांगीतले ना ;ज्यांना आपण खरच मानतो...त्यांचे आपण ऐकतो..जीव लावून...!!....लोक त्यांना पुस्तकातून पाहतात...समाज म्हणतो म्हणून नमस्कार करतात..पण त्यांना "सत्य"म्हणून स्वीकारू शकत  नाहीत...!!...[इतके सोपे नाही ते...आस लागते ;नशीब लागते त्याला..असो]

 लोकांची खरी दैवते भलतीच असतात.!...त्यांची..त्या देवतांची  मंदीरे नसतात ..टोलेजंग..!!
नसतात उपास तापास !! ....काडीमात्र  बंधने नसतात...त्यांना !
पण ही दैवते भयंकर ..सर्वत्र ..अंतर्बाह्य पसरलेली असतात...[सर्व व्यापी...अगदी शब्दश:]
अहोरात्र त्यांचीच पूजा होत असते...लोक्मान्सातून...!!
ह्या अहर्निश भक्तीच्या उन्मत्त शक्तीने..ही देवतांची फौज नवीन नवीन 
वरदानान्ची खैरात करत असते...!!..आपल्या अबोध भक्तांवर..!!..
अक्खे जग त्यांचे भक्त..सारी माणसे त्यांची अनुरक्त ..!!
...".ह्या " देवतांना शरण न जाणारेसुद्धा  ....असतात !!..पण ..अगदी ..म्हणजे अगदीच थोड़े..एखाद दुसरा . कोट्यवधीन्मधे..!!
ते जाणतात ..ह्या देवांचे थोटेपण..खोटे पण ......"ते" नकार देतात ह्या देवांना "खरे"देव म्हणायला ....
."ते" नाव देतात या देवांना "षड-वीकारांचे ".!!.......आणि सांगतात सम्पूर्ण जगाला ...."त्यांच्या" असत्याचे "भीषण "सत्य ...आणि ब्रह्म सत्याचे वास्तव...!!
...अगदी कंठ शोष करून..!!....
.जगातले काही जागतात सुद्धा या शब्दानी...
..पण अखेरीस काय ...निष्पन्न   ??.....
मी सुरुवातीलाच म्हंटले ना..!!
"ही वीकारांची दैवते फार फार भयंकर असतात.."......
त्यांचे गुलाम भक्त त्यांना सोडणार नाहीत अशी कड़क सोय करतातच ते...!!
आणि मग??....मग काय ..."संतांची ; दार्शनीकान्ची..; धिंड निघते .."प्रथम लोकांच्या मनातून ;नंतर समाजातून..!!"
.....अर्थात ...समाजाला समजत नाही .....सत्याची आवश्यकता "त्यांना"आहे..संतांना नव्हे..!!...!!

-------------------------------------------------------हर्षल १\१\११.......

Friday, December 24, 2010

An extract .from ."THE ETERNAL DUAL ..".....of my writings...!!

it would be  too early.........he thought.....about asking her.. 

when he was very near......nearer to her.......as both of them ...too unknown to each other..that time!!


then there were times ........he could have talked to her...atleast....!!


as they had ...atleast by then known to each other......to some extent..!!!
 
but he just let moments freely to be wasted...couldnt get nearer to her ....!.not by a single chance!!


times passed away......
.while passing as always time does...it marked their past AND carved on them the maturity.;increased their age....!!....
one more thing  the time somehow managed;very precisely;.....it PARTED them............totally seperated...differentiated.....!!


now was the problem for him....!!......she went without any relation ....HE remained with a specificationless AFFECTION.......unknown ....unsupported .......unacknowledged ....!!


""TIME has PLAYED foul games "" he used to think when he used to be in silent moments with himself ..thinking of HER and his own miserable life...!!


not only THE TIME had  removed his beloved to a far remote and unapproachable distance ;but also had scratched  HIS life by indeterminate and unsolved questions of stubborn and darkest destiny! HE couldnt  SOLVE them...the unwise dreadful questions..!!........
he fought with them as he could ....but doesnt know whether he won a bit or instead lost the whole essence of  his life [which once was so aspiring ..and demanding]...!!
 
......now someday he settles down at a lonely place......looks at completely changed himself....as if transformed from a golden object to some cast iron shineless thing ......feels awkward to look at himself....to recognize himself.......and suddenly HE remembers HER.........he sinks too deep inside the memories of her ........................

HE knows SHE LIVES STILL somewhere to a reachable distance by a vehicle......HE CAN SEE her smile IF he pursues her ....HE can even see her if he forcefully intends and tries to do so.......
.................BUT ....NO...!!....HE  knows well .....NOW it is not the matter of physical distance between them.....Which SEPARATES them.....but the LIVES of them have had been truly  and vigorously bifurcated ... ..they are not supposed to be united ...or mended together .................!!!



""IT  IS TOO LATE...""...........!!....HE SAYS TO HIMSELF AND THE IMAGE OF HER IN HIS HEART                            


 written by harshal
                           from his writings  
                           "the eternal dual"


........... 

Sunday, December 19, 2010

expressions for TRUTH...............!!

it is not the things we decide .......
but it is  the things who decide .......

what to flourish ,,,.......and when..!!
that all makes "DESTINY"..........!

THE power to strive is the outcome  of what we intake ....when we remain powerless..

  • it is the strength ..yet unknown to us whether it just depends upon the circumstances we are presented to overcome...or the instinct ...or the succession that already has been captivated by the soul during the birth of us..!!.....the prominent thing among this is that the ways of life are so scientifically arranged ..based on the minuscule fine laws though apparently unseen;but omnipresent and rigid enough to bind the events in all respects ...this extremely interlinked pre-maintained synopsis is out of bound of what is generally known as "philosophy of life"....................
 as we must understand ;the philosophical limits are not the real limits of philosophy as we many times presume;but they are the "relative  in capabilities" of the  humans who do not recognize the acute and inseparable unity in the universe; before propounding so called "philosophical "theories!!!............ 
....................................by''harshal deshpande"......................18d10

तुझ्यावीण...................................!!!!!!!

कधी वाटते चन्द्र होउन यावे..
तुझ्या दिव्य रूपावरी  पाझरावे..
तुझे नेत्र मिटता..हलुवार तेथे ..
तुझ्या शांत  निद्रेतूनी .स्वप्न व्हावे..


तुझे श्वास ते सौम्य ;झूलता  जरासे
तुझे ओठ निशब्द ;हलता जरासे ;
तुझे भाव अव्यक्त समजून घ्यावे;
तुझे नाव हृदयात ऐसे वसावे..!


पसरला सभोती दिशांचा पसारा..
पसरला जगाचा असा खेळ सारा..
तरी त्यात माझे नसे चित्त काही..
तुझ्यावीण ते सौख्य येणार नाही..
 इथे मानवान्च्या महाभव्य जत्रा
क्षणांच्या सुखाच्या बहुरंग यात्रा;
 तरी त्यात  नाही सुखाचा निवारा..


तुझ्यावीण हां जन्म निर्जीव सारा.......!!


हर्षल ............१८डी १० 

Wednesday, November 24, 2010

ईश्वर..!!

ईश्वराला शोधायची आवश्यकता नाही...

समस्त प्रश्नांचा अंत झाल्यावर ..तो आपोआप दृश्यमान होतो.......

...........परमेश्वर तर्कांच्या..; बुद्धीच्या पलिकडे विद्यमान आहे...!!

......अट एकच आहे...त्याला भेटण्यासाठी ..........ती म्हणजे ;;

आपले प्रश्न ;आपले तर्क ......"आपल्यातले "आपण"....संपून जायला हवे......!!

Thursday, November 11, 2010

******** philosophy ***********



it is the case with most of us ...who learn and go on doing the same...without knowing the adaptation we unknowingly do or accept in the process called as "learning"..!!
 
when the search of the life and all around us..the universe ..will be done or made by accurate and wholesome
understanding of "relativity"..and "unity".......we start gaining what is known as "knowledge"..!!
 
science or art or any other part or stream of the information or any kind of virtue .........they are not different..!!..all coincide at a point...this unity of grasping the truth is the real "knowledge"or say "philosophy"..
we analyze the unique phenomenon by number of names ..focusing on certain prior aspect of the event...hence we analyze always a fraction of the incidence...the truth is like a point..accurate .. but still may be existing or non existing..!!...if u say a point exists [in maths]..u cant give the dimensions for it..the existence of point is only adopted on the basis of "mere idea of accepting its existence"........but if u dont accept it.no dimension can take birth!!........like wise the core form of truth is existing but free of any binding ...but without which nothing can form or exist!!!,............
 
*************************** h a r s h a l *******.

Wednesday, November 10, 2010

तो आणि ती ----भाग २

तो आणि ती ---part second
                                           ..*..........ती ............*


"ती ज़रा अस्वस्थच  होती काल पासून ....तीलाच कळत नव्हते!!..
आज   ती लवकर उठली..फ्रेश व्हायला फारसा वेळ न लावता तयार होउन खाली आली....
कालच तिला मागणी आली होती..मुलगा चांगला एम. बी. ए!!. ....महितितला !!..आई बाबांना आवडलेला !!...गोरापान ..अगदी नाव ठेवायला जागा नाही!!...........
मुख्य म्हणजे दारात स्थळ चालत आलेले !!..काल रात्री तीच्या वाढदिवसाला बाबांनी घोषणा सुद्धा केली भर पार्टीत !!!...कित्ती मित्र -मैत्रिणी आले होते.!!.
..पण..पण ..काहीतरी चुकत होत!!.... अचानक लग्न !!..काहीतरी चुकत होते.!!.
.मागणी घालणारा मुलगा उत्तम होताच ..पण तिला उगाचच अस्वस्थ वाटत होते..!! ती विचार करू लागली ,""  .अगदी तरुण वयापासुनच..तिला वाटायच  आपण प्रेम वगैरे कराव,,अगदी जीवापाड  !!..पण तशी  वेळच  नाही आली.. !!.अभ्यास ..मित्र .मैत्रिणी .यात वेळ कसा उडाला आणि कॉलेज कधी संपले ते लक्षातच नाही आले..!!रोमांटिक कथा पुस्तकापुरत्या उरल्या."".तीच्या  मनाने एक अलगद हुंदका दीला..,,,",आता  ते सारे संपणार ..स्वप्नांचे जग ..प्रेम कवितांची हुरहुर ...!!"";
.."'आपल्याला आपल्या आवडीचा कोणी भेटलाच नाही का??..की तसा कुणी असून आपणच दुर्लक्ष केले?""........ती स्वतालाच तपासू लागली.................
."".आजवर कॉलेजात अनेक मुलगे मागे लागले असतील...पण तेवढयापुरते..!!"....
...ती तशी दिसायला गोड होतीच.....हुशार  सुद्धा ! ......तिला वाटल .."; खरच!; आजवर आपल्यावर प्रेम करणारा ...प्रमाणिक प्रेम करणारा कुणीच कसा नाही भेटला..?..निदान आपल्याला तसे का नाही वाटल कुठल्या मुलाबद्दल??....आपण  तर ठरवले होते ,..प्रेम विवाह करावा...निदान प्रेम तरी.!.".....ती विचारांत बुडाली ....."असा कुणी होता का /..ज्याला आपण आवडत होतो..मनापासून??"....


..........अचानक तिला धक्का बसला ...हलकासा !!...एक अस्पष्ट चित्र.. "ती"च्या  अबोध मनाने चितारले देखिल होते....."त्या"चे!!!.
  ""तो"?..."तो ?" ....हो नक्की तोच .......पण "तो "तर तिच्याशी बोलायचा देखील नाही....एकच नव्हे  तर अनेक वर्ष....!!


ते दोघे एका वर्गात नव्हते ....कॉलेजात नव्हते ...एका समान विश्वात नव्हते ...अगदी दोन साध्या मित्रांत असते तितकी सुद्धा ओळख नव्हती त्या दोघांची.. .फ़क्त ते एकमेकाना सामान्य  परिचयाचे होते..एकमेकांच्या आसपास राहणारे !!बस्स..!!इतकेच..!! ....पण कुठलेसे नाते दोघांत जन्मापासून बनले होते ठावूक नाही...."हाच अदृश्य बंध आपल्याला त्रास देतोय का?" तिला वाटले !!....."".काल पार्टीत "तो" होता का?..होय..होता तो..!!..शांत पणे आपल्याकडे बघत होता!!..आपण एकच क्षण पाहिले असेल त्याला !!..काहीतरी  सांगायचे ..असल्यासारखा अगतीक चेहरा होता त्याचा....बाबांनी लग्नाची घोषणा केल्यावर तो
दिसलाच नाही...."" ...ती अचानक भानावर आली..!!..आपण विचार करतोय ते खरे की भास् ??...काहीच समजेना  ..!!....एकच प्रश्न होता.."' की ;हे जर खरे असेल तर त्याने या आधी सांगितले का नाही??"...ती अस्वस्थ झाली....


.......इतक्यात ..तीचा फोन वाजला .. सुप्रियाचा होता ...सुप्रिया फोनवर विचित्र आवाजात थरथरत बोलत होती..आवाज कंप पावत होता..पण तिला स्पष्ट ऐकू आले "त्या"चे नाव.. सुप्रिया पुढे  सांगत होती;"".."तो ".."तो " काल पार्टी अर्धवट सोडून गेल्यावर ; वेड्यासारखा रात्री एकटाच शहरात फिरत होता...मध्यरात्री रस्त्यावर बेशुद्ध होउन पडला ...पहाटे दवाखान्यात नेले....अजुन तस्साच आहे..शुद्ध नाही!!..आणि..आणि...".त्या"च्या हातात तुझा चुरगाळलेला ...फोटो होता.""!!


 *****************लेखन---हर्षल...{काल्पनिक कथा]....

तो आणि ती --- part one

..........................*******.........तो......******
तो रस्त्यांवरून रात्रीचा  एकटाच चालतोय...
डांबरी रस्त्यावरून पाउस नुकताच सरपटून  गेलाय ....
ओलसर कात टाकलेल्या नागासारखा ...वळत -वळत पुढे पुढे धावणारा रस्ता...
सर्वत्र अंधार ..दोन्ही बाजूंच्या रस्त्यावरच्या दिव्यांच्या ओंजळीतून  ओसंडणारा प्रकाश ..तेवढाच जीवंत पणा..सम्पूर्ण अंधारात..!!....
.त्याच्याशिवाय रस्त्यावर कोणीही नाही....!!
लांब  कुठेतरी शेवटची लोकल ट्रेन ..निघून गेल्याची अस्पष्ट सूचना ....!!..आता पहाटेशिवाय लोकल सुद्धा नाही..
"किती वेळ फिरणार आहेस.?"...तो मनाला विचारतो.....काहीही उत्तर नाही..
पाठीच्या म ण क्या तून वाहणारी बधीर संवेदना ....मनाला गुरफटून बंद करून शरिराभोवती वेढ़े टाकून बसलेली आहे..
कित्येक तास झालेत ....वेढा अजुन सुटत नाही....
.पाय यंत्रासारखे चाललेत ....दिशा नाही ..नियंत्रण तर अजिबातच नाही..
.....कुठेतरी माणसांची चाहुल लागते....हो..दारुडेच असणार बहुतेक ..".तो " थोडासा भानावर येतो....
...आजुबाजुचा निर्जन भाग ....दमलेले पाय ...सुन्न मन...
सारे जाणवते आहे आता "त्याला"....सारे आठवते आहे आता...अगदी स्पष्ट !!..विषासारखे दाहक   ..!!.. 


.........आणि आठवलेले सारे सत्य आहे...ही भयंकर जाणीव सुद्धा ......त्याच्या मुठी त्वेषाने व ळ तात.....
अंग दु:खाने  थरथरते....डोळ्यांतून अश्रूंचा अबोल झरा ओसंडून वाहू लागतो.....
..एका एकी स्मृतींचे ....फार जुन्या स्मृतींचे
चित्रपट मस्तकात चक्राकार गतीने गर्दी करतात ......आणि "तो" विसरतो...आसपासच्या अर्धप्रकाशीत शांत विश्वाला...
....मस्तकात गतकालाच्या स्मृतींचे थैमान सुरु होते....असह्य ...एकेक आठवण...एकेक स्वप्न .....
मेंदू विचार करण्याच्या पलिकडे पोचतो...छाती फाडून बाहर येइल ..अशी हृदयाची धडपड सुरु होते...!!
.सारेच  सन्दर्भ सुटतात ...विचारांची मनावरची पकड़ पार सुटून जाते.!1.
..का ळ.-..वेळ- जाणीव शून्यात कोसळत जाते..!!..अगदी खोल ..भयंकर अंधाराचे आवर्त उधाणलेले असतात...!!सैताना सारखे .....!!...भविष्याचे पडदे दिसेनासे होतात...वर्तमानाचे फास गच्च बसतात ...अखंड शरीरा-भोवती..!!
.....मन अस्वस्थ्तेच्या अन्तिम पायरीवर उसळते..............!!!!


........आणी ..अचानक सारे थंड पड़ते ...   ."तो "  भर रस्त्यावर कोसळतो.!!.उध्वस्त  व्रुक्षासारखा!!... एकाकी .रस्त्याच्या   मध्यावर .!!.ओल्याशार रस्त्यावर तो पडताना हलकासा आवाज होतो...तेव्हढाच  !!. पुन्हा......सारे काही शांत होते,!!*****


**** इस्पितळ!त..."त्या"च्या   बेशुद्ध देहाशेजारी उभे राहून नर्स घरच्यांना विचारते ...."काय झाल  काय ?..ही इज वेरी सिरिअस    ;तो आता माणसांत परत येइल हीच शंका आहे..!"...........
घरचे सारे निरुत्तर ...........
त्याचा एकुलता एक जीवलग  मित्र अश्रु सावरत ओरडतो.." "ती ".."त्या"च्यापासून फार दूर गेली ; डॉक्टर";...कायमची!!..  अगदी कायमची ...बहुतेक .!..""!!!


--------------लेखन ------हर्षल.......(काल्पनिक कथा  आहे याची कृपया नोंद असावी ;लेखक सुद्धा सुस्थितीत आहे हे लक्षात असू द्यावे.@@!! )