Wednesday, April 18, 2012

..!! मित्र आणि अटेस्टेशन [सत्यकथा ]....!!

"बोकड आला का रे ?"
"नाही रे;कधीपासून वाट बघतोय; गेला असेल चरायला कुठेतरी "
"अरे मग त्या डुकराला फोन नाही करता येत?"
"नाहीतर काय..पाच वाजता ठरल होत ना यायचं ?"
"अरे तुम्ही दोघे महा मट्ठ आहात..त्या गाढवाला काय महत्वाची कामे देता रे?"
"हो रे;...हा ..हा विन्या ह्यालाच जाम मस्ती अंगात ;त्या माकडाला नको ते कोलीत देऊन ठेवतो हा"
"ए ;माझ्यावर काय घसरतोस ?..मी एवढंच बोललो..त्याच्या ऑफिसजवळ दुकान आहे तो घेऊन येईल ..त्यात माझं काय चुकले?"
"नाही बाबा ..तुझ काय पण नाय चुकले..अरे तो जंगली प्राणी  का नाही आलाय मग अजून?? ते तरी सांग?"...
..
................[एवढ्यात मी येतो.]..[आता तुम्हाला वाटेल कि मला आधीचा संवाद कसा कळला ?..तर त्याचे उत्तर असे कि मी माझ्या मित्रांना फार चांगला ओळखतो..वाक्य बदलणार नाहीत फार तर ती बोलणारी तोंडे थोडी बदलतील..!!असो..]

मी: काय रे माझ्या नावाने काय शिमगा चालला होता?
चम्प्या: हा बघ आला हुंदडून ...कुठे गेला होतास बोकडा??..दाढी करायला का?
मी: बोकड दाढी करायला बसलेला कुठे बघितलास सलून मध्ये?
चम्प्या: तुला बघितलाय न किती तरी वेळा..!!उशीर का झाला ते सांग..!!
मी: अरे मीटिंग होती रे..!!वेळ लागला !!
मंग्या: अरे ते मरू देत ..काम झाल का?
विन्या: हो रे ..झाल का?
मी: थांब जरा ..!!..काय उलट तपासणी घेताय कि काय अगदी?
नान्या: ए मठ्ठा ..काम झालाय का ?
मी: अर्ध झालंय..उद्या अर्ध होईल..!!
नान्या: [डोके धरून]..अरे बेअक्कल माणसा तुला जनाची नाही तर मनाची तरी ??
मंग्या: तरी मी सांगत होतो "डुक्कर ते डुक्कर"....पण तुम्हालाच जाम विश्वास..!!
चम्प्या: अरे वाट लागेल आता..काय रे साल्या ..तुला इतका बेफिकीर कोणी बनवला रे..अरे इकडे आम्ही जीव टांगणीला लावून बसलोय...आणि आता हे असे सांगतोस?"..तुला खरच सोलला पाहिजे.."
विन्या: अरे थांबा..काय रे असं कसं झालं?..आज लास्ट डे होता यार..!!
काल नोटीस वाचलीस ना...२९ मार्च शेवटचा दिवस,...!!
मंग्या: अरे विन्या खरं म्हणजे तुलाच कुटला पाहिजे...खरा मद्दड तू आहेस...!!
मंग्या: अरे आता ते जाऊ देत यार...उद्याच काय करायचं?...सगळे प्लान फेल गेले..काय यार तू??
मी: अरे सॉरी....पण
चम्प्या:  सॉरी ??..तुज्या लग्नाची लॉरी!!...नीच माणसा लाज नाही वाटत सॉरी म्हणायला..??
मी: अरे त्यात काय उद्या करूयात ना....एका दिवसाने काय होणारे?..
मंग्या: विन्या ह्याला इथेच गाडू का??..एका दिवसाने ??..अरे मतिमंदा ;एका दिवसाने लास्ट डेट सुद्धा संपून जाणारे...!!..फॉर्म काय पर्वा भरणार का?
चम्प्या: म्हणून म्हणत होतो अटेसस्टेशन इथेच करून घेऊयात ...ह्याच्या ऑफिस जवळ नको...आज मी काहीतरी करून आणले असते ना...!!पण नाही  सगळे फॉर्म घेऊन हा बोकड दादरला मिटींगमध्ये बसला होता..!!आणि आम्ही इथे सडतोय वाट बघत..!!
मी: अरे पण सगळ्यांचीच चूक आहे..एकतर फॉर्म लवकर भरायला आपण चुकलो..आता मला का शिव्या देताय??
विन्या: हो रे आपण उगाच वेळ काढला रे,..!!
मंग्या: अरे ;पण आपल्याला उशीरा कळलं तर आपण काय करणार?.दोन दिवसापूर्वी कळलं ना,,हां.. आता दोन दिवस आपण वाया घालवले ..पण ठीक आहे ..कितीवेळ चुका उगाळणार...??आणि आज काम झालं असत तरी उद्या भरू शकत होतो... !
मी: [चेहरा पाडून]..सॉरी रे..खरच ..मी आत्ताच्या आत्ता जाऊन बघतो काही होतंय का?माझा नाही झाला तरी चालेल पण तुमचा तरी आटेस्ट करून आणतो..माझ्यामुळे उगाच त्रास..!!
मंग्या:  ए ;एवढा काय चेहरा पडतो रे?...आणि तू काय परत जाणार इतक्या लांब..मरू दे रे..बघू दुसरा काही जमतंय का?
चम्प्या: बरोबर रे..जाऊ दे रे ..बघू काहीतरी..
[बाकीचे सुद्धा तेच म्हणतात]
 नान्या: चल काहीतरी खावूयात ..मग एक कटिंग मारू...फोर्मच काम होईल रे...फार काय दोन महिन्यांनी परत जाऊ स्पर्धेला..शेवटी कॅरम हा गेम आहे..यावेळी दुसरा कोणीतरी खेळेल आपल्याऐवजी..!
मी: अरे पण मीच कारणीभूत आहे यार..मी जरा लवकर निघालो असतो तर काम झाल असत यार..!!
मंग्या:. .आता बास रे तो विषय ..या वेळी स्पर्धा सोडली असं समजा ..त्यात काय रडायचं??
फालतू स्पर्धेसाठी दोस्ती जाळू काय रे..??
मी: पण स्पर्धा खेळाय्चीच...आणि दोस्ती पण तोडायची नाही ..!!
सगळे: म्हणजे??
मी: फॉर्मच काम झालाय रे........जरा खेचत होतो....खीखीखीखी ..!!
मंग्या: [आनंदात गुद्दा हाणत]:साल्या बोकडा ..मग मीटिंग च काय केलंस..??
मी: अर्ध्यात सोडली..आपल्या ग्रुपच काम आहे रे...येडा आहे का मी मीटिंग करायला?
नान्या:  [मला मिठी मारून...स्वताचे  डोळे पुसतो]
चम्प्या : बोलां....रानडुकराचा.......
सगळे[माझ्यासकट ].....विजय असो........!!

Tuesday, March 27, 2012

!!.........कल्याण करी रामराया ......!!

कल्याण करी रामराया ..
जनहित विवरी !!जनहित विवरी..!! कल्याण करी रामराया ..


तळमळ तळमळ होतची आहे ...
तुझा तूच सावरी ..दयाळा ...!! कल्याण करी रामराया ..


अपराधी जन चुकतची गेले ..
हे जन हाती धरी ..दयाळा ..!! कल्याण करी रामराया ..
   

कठीण त्यावरी कठीणचि जाले..
आता न दिसे उरी दयाळा.....कल्याण करी रामराया !!

कोठे जावे काय करावे ;
आरंभिली बोहरी ;दयाळा ....कल्याण करी रामराया !!

दास म्हणे आम्ही केले पावलो ..
दयेस नाही सरि...दयाळा ...कल्याण करी रामराया !!
----------------------------------समर्थ रामदास स्वामी !!
   
 

Thursday, March 8, 2012

!!!!! गदिमा आणि मी ..!!


गदिमा हे नाव मी अगदी लहान  म्हणजे सुमारे सात आठ वर्षाचा असताना प्रथम ऐकले असेल..नावाचा अर्थ तेंव्हा कळला नाही.नन्तर कळले कि ते एका माणसाचे नाव आहे.हळू हळू कळले कि ते एक फार मोठे कवी होते...

आणि साधारण सोळाव्या वर्षी समजू लागले कि अर्वाचीन युगातील मराठी काव्यप्रतिभेचा तो सर्वोच्च मेरुशीर्ष आहे....विसाव्या वर्षी खात्री पटली कि वेदकाळात लुप्त झालेली प्राचीन सरस्वती 
ग. दि. माडगुळकर या नावाच्या महाराष्ट्राच्या एका साध्या देशस्थ ब्राह्मण कुलोत्पन्न भाषाप्रभूच्या हृदयात आपली शब्दसंपदा घेऊन पुन्हा प्रकट झालेली आहे. 
 मी गीतरामायण ऐकले ते तुकड्या तुकड्याने..मला ते आवडले देखील ...पण नन्तर मी जेंव्हा ते वाचले अगदी एकटेपणाने मनस्वीतेने तेंव्हा प्राकृत मराठमोळी भाषा "अमृतातेही पैजा "कशा जिंकते ;इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष देववाणी सुद्धा इतकी सहज पणे प्राकृतातून कशी उर्जस्वला होऊन भावदायिनी होते;या आश्चर्यमग्न करणार्या वस्तुस्थितीचे मला जिवंत दर्शन झाले.
गदिमांच्या लेखनाइतके नितांतसुंदर ;भावपूर्ण आणि लयात्मक काव्यलेखन अत्यंत दुर्मिळ आहे.काव्य मोजण्याच्या अनेक मोजपट्ट्या असतील ,आणि म्हणून अनेक कवींना काव्यलेखनात उत्तम मूल्य प्राप्त करून दिलेले आहे .परंतु या सर्व उत्तमोत्तम कवींमध्ये गदिमांच्या काव्यलेखनाचे मूल्य प्रथम स्थानावर "स्वयमेव मृगेन्द्रता"या न्यायाने सुप्रतिष्ठीत झालेले आहे.
गदिमांचे काव्य वाचणे म्हणजे मनाला प्रत्यक्ष शारदेच्या महान शब्द-भवनातून विहार घडवून आणणे.इतके सुंदर;इतके प्रभावी ;इतके नेमके आणि इतके उच्चार-सहजतेने नटलेले शब्दशिल्प पाहणे;वाचणे आणि अनुभवणे हीच एक अपूर्वोत्तम गोष्ट आहे........!!
गदिमांचे काव्यलेखन म्हणजे "इथे थांबती तर्क वेदमय "असे ज्या पर-ब्रह्माबद्दल म्हंटले जाते तसेच अलौकिक आणि अद्वितीय असे आहे.


गदिमांचे काव्य शब्द;स्वर आणि भाव याबरोबरच एक संतत्वाचा स्पर्श घेऊन आलेली तरलता दर्शवते...

"ज्ञानियाचा व तुक्याचा 
तोच माझा वंश आहे..
माझिया रक्तात थोडा 
ईश्वराचा अंश आहे.!!".....असे त्यांचे स्वताचे उद्गार असत्य नव्हेत..!!
साधे शब्दच पण त्यांची अशी बेजोड आणि अपूर्व रचना मी अद्याप पहिली नाही..
गीत रामायणात सुग्रीव रामाला म्हणतो कि आजपासून मी तुझा मित्र झालो तेंव्हा गदिमा लिहून जातात 
"दुखीच साह्य होतो दुःखात दुःखीताच्या ".केवळ अपूर्व !!

किंवा राम रावण वधानंतर सीतेस म्हणतो :
"किती यत्ने मी पुन्हा पाहिली तूते लीनते चारुते सीते "
किंवा त्याच काव्यात प्रभू श्रीरामाचा पराक्रम किती जाज्वल्य होता हे गदिमा एका ओळीत लिहितात ;"
श्रीराम म्हणतात सीतेला..
"शब्द्दांची झाली पूर्ती 
 निष्कलंक झाली कीर्ती 
पाहिली प्रियेची मूर्ती 
मी शौर्याने वाकविले दैवांते"  ....
 मी शौर्याने प्रत्यक्ष दैव वाकवले ह्या एका वाक्यात तो राम पराक्रम नजरेपुढे साकार होतो...

गदिमांचे लेखन आणि शब्दकळा ;भाषेवर प्रभुत्व केवळ अप्रतीम आहे ईतकेच नव्हे तर त्यांचे तत्त्वचिंतन आणि उत्तम प्रतिभा केवळ अजोड आहे...!! गदिमा आणि मी       

Tuesday, March 6, 2012

गदिमांच्या गीतरामायणातील एक कडवे..!!

:माझे आवडते वाक्य :----
गदिमांच्या गीतरामायणातील एक कडवे..!!
राम सीतेला म्हणतो :

संपले भयानक युद्ध 
दंडीला पुरा अपराध 
मावळला आता क्रोध 
मी केले जे ;उचित नृपांते होते..!!

 शब्दांची झाली पूर्ती 
निष्कलंक झाली कीर्ती 
पाहिली प्रियेची मूर्ती 
मी शौर्याने वाकवीले दैवांते..!!!



Thursday, February 23, 2012

......!!...सामर्थ्य ........!!


सामर्थ्य असो उत्तुंग 
विश्व जे तारी..
सुर-नरवीर ज्याची
नित्य गात ललकारी..!!

ध्वज विजयांचे जे 
उंच उभारत जाते ..
सामान्यही ते सन्मान्य
जयाने होते..!! 

 
जे मुक्त उसळता 
शौर्यबीज झळझळते ..
जे प्रमत्त होता..
धैर्यवीज सळसळते ..!!
   
सामर्थ्य शुद्ध ते 
धर्म जयातून स्फुरतो..
प्रत्यक्ष शिवाचा 
नेत्र जयातून जळतो..   

सामर्थ्य ईश्वरा असे 
दान दे आता...
जे दैवाचा शौर्याने 
नमवील माथा...!!!

-------------------------------हर्षल-----------------



 

 

Friday, February 3, 2012

शालिवाहन ...............!!!


विक्रमादित्य पौत्रश्च [ =शालिवाहन ] पितृराज्यं गृहीत्वान !!

जित्वा शकान दुराधार्षचान तैत्तरी देशजान...!!
बल्हीकान कामारूपाश्च रोमजान खुरजान छटान
तेषां कोशान गृहीत्वा च दंड योग्यान कारयत..!!

स्थापिता तेन मर्यादा मलेछ-आर्यानाम पृथक पृथक !!
सिंधुस्थानाम इति दनेयं राष्ट्रम आर्यस्यचोत्तमम !!
म्लेन्च्ह स्थानं परं सिंधो कृतं तेन महात्मना ...!!
------------------------------------भविष्य पुराण---------------------

Tuesday, January 31, 2012

मग माझा जीव ..........!!

दुखाच्या वाटेवर गाव तुझे लागले 
    थबकले न पाय तरी ;हृदय मात्र थांबले ....!!

वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली..
     अन माझी पायपीट डोळ्यांतून सांडली....

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल..!!
        अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल...!!

सहज कधी तू घरात लावशील सांजवात ..
           माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल .....!!
=================================================सुरेश भट.........

Monday, January 30, 2012

अग्निपथ ..!!!!

तू  न  थकेगा  कभी ...
तू  न  मुड़ेगा  कभी....
तू  न  थमेगा  कभी.....
कर  शपथ !.. कर शपथ !...अग्निपथ !!


ये  महान  दृश्य  है ..
चल  रहा  मनुष्य  है...
अश्रु , स्वेद , रक्त से ..
लथपथ .. लथपथ ...!!

....अग्निपथ !!अग्निपथ !!अग्निपथ !!

--------------------------हरिवंश राय बच्चन ..[अग्निपथ]

Tuesday, January 3, 2012

अंतिम चरण लेखमालेतील उतारा !!...from my writings ..



अंतिम चरण ::लेखमालेतील उतारा 
            from my writings
                 
              स्वप्न-भंग

तो:--- [स्वतःच्या हातातील 'ती'चे छायाचित्र खिन्नपणे वाहत्या पाण्यात सोडून देतो..चित्र सावकाश नजरेआड होते.. आणि तो किनार्याजवळ  एका पाषाणावर बसून बोलत आहे !!]

"" एक अलिखित करार तुटला...

एक बंध कायमचा तुटला.......

एक नाद कायमचा सुटला.....
एक आशावाद कायमचा फुटला...

एक घाव कायमचा बसला ...
एक व्रण कायमचा उठला ....
अशा जखमा ;असे आघात ....
अशी वळणे ;असे अपघात ....
तसे कमी येतात जगताना...हीच देवाची दया...
नाहीतर ...माणसे कधीच हसू शकली नसती...


जाऊ देत ........
तुला काय कळणार म्हणा...!!
आघात करणारे बहिरे असतात ...
अन सोसणारे नेहेमी मुके ...
माझ्या आयुष्याची होळी झाली तरी....
त्या धुराचा गंध देखील येणार नाही अशा दूरच्या सुखतृप्त
प्रदेशांत तुझा निवास आहे .......... ....


आपण अपरिचित होतो.....
आणि तसेच राहणार...परिचय असून सदैव अपरिचित राहिलेले आपण .......


असेच राहू .....दिगन्तापर्यंत.....किमान आपले आयुष्य संपेपर्यंत...


अर्थात हे सुद्धा माझे मत आहे.......


मला येईल सदोदित तुझी आठवण..
मला वाटेल अस्वस्थ हुरहूर तुझ्या नावाने...
आणि व्याकूळ होतील माझे प्राण ....
उधळून जातील माझे प्रत्येक क्षण भविष्यातले ;जेंव्हा जागी होईल तुझी स्मृती माझ्या मनांतून.........

पण हे फक्त माझे आणि माझेच मत आहे..........



तुला कल्पनाही नसेल...तुझ्या स्वर्गामध्ये ;तुझ्या अपार सुखांमध्ये ...रममाण असशील तू...!!

पण जर कधी बघशील चुकून ..तुझ्या स्वर्गातून डोकावून खाली ..!!

तर जळलेली वैराण अस्वस्थ धरणी दिसेल एका आयुष्याची....


मी तिथेच असेन...एकटा..जळणार्या दुःखांना मस्तकावर घेत धडाडून जळणारा ..शांत ..निराश्रित !!......  





........................संदर्भ :-"तो आणि ती "

या माझ्या लेखमालेतील अंतिम भागातील एक उतारा....
======================================लेखन - हर्षल!!
शोकरस हा नवरसांमध्ये अति महत्वाचा आहे..त्यावर आधारीत हे लेखन आहे...






विशेष सूचना...""..वाचून झाल्यावर आकांड-तांडव करून रडू नये!!...लेखाचा लेखकाच्या जीवनाशी संबंध लेखानापुर्ताच आहे...लेखक सुस्थितीत आहे...प्रसंग काल्पनिक आहे..कळावे..

Saturday, December 31, 2011

सुभाषित .......2..!!

 विचारोनी बोले विवंचोनी चाले 
 तयाचेनि संतप्त तेही निवाले 
 तयाचे पुढे शोक संताप कैंचा 
 जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा !!.....समर्थ रामदास स्वामी !!




या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी !!!

 अर्थात "सर्व प्राणी जेंव्हा रात्री निद्रिस्त होतात तेंव्हा संयमी [योगी]जागा असतो.."याला आध्यात्मिक अर्थ मोठा आहे ...असो..


भगवंताने ५००० वर्षांपूर्वी हे सांगितले तेंव्हा ३१ डिसेंबर च्या पार्ट्या होत नव्हत्या ....नाहीतर भगवंत म्हणाले असते...

या "निशा" सर्व भूतानां ;तस्यां जागर्ति मद्यपी !!

सुभाषित ......!!

आघ्रातम परीचुम्बितम ननु मुहूरलिढम
ततः चर्वितम..!!
त्यक्तं वा भुवि नीरसेन मनसा ..तत्रं व्यथा मा
कृता!!
हे सद्रत्न ,तवैतदेव कुशलं ;यद्वानरेणाsदरात 
अन्तःसारविलोकीन व्यसनीना चूर्णीकृतं नाश्मना:!!


हे सुंदर रत्ना ;एका माकडाने तुला उचलून हुंगले ;चोखून किंवा चावून बघितले आणि जमिनीवर फेकून दिले यामध्ये वाईट वाटून घेऊ नकोस [ शेवटी ते माकड आहे !!]...उलट प्रत्येक गोष्टीत आत काय दडवले आहे अशी उत्सुकता असणार्या माकडाने तुझ्या आत काय आहे या उत्सुकतेपोटी तुला फोडून नाही पाहिले यात स्वताला भाग्यवान समज..........[नाहीतर तुझे अस्तित्वच संपले असते ].!!


   

Thursday, December 22, 2011

देवाचा अनुभव ............!!!!

आनंद आहे......जे जे हवे ते ते अवचित मिळते ...आणि विचार करून डोके थकून गेल्यावर जे विचार केलेही नसतील त्या मार्गाने मिळते हा एक थक्क करणारा अनुभव परत गाठीशी बांधला गेलाय..........

छान आहे.........अजब माया देवा तुझी !! 

सगळे प्रयत्न आणि तर्क संपल्यावर देवाच्या साम्राज्याची हद्द सुरु होते असे म्हणतात............भले मोठे माजलेले गर्व जिथे सटकन उतरून जातात अशी ही देवाची साम्राज्य सीमा...

खरच अफाट आहे सगळे.......शौर्य ;धैर्य आणि समाधान सगळेच देव देतो ......सगळेच देवाचे आहे........

उपनिषदात म्हंटले आहे ...
"त्वमेव सृष्ट्वा त्वदेव प्राविश्यत!!"
 अर्थात तूच सगळे निर्माण केलेस आणि तूच त्यांच्यात प्रवेश करून त्यांना व्यापून बसलास.............

निर्मिती आणि निर्माण करणारा एकच आहे....निर्मिती जी असते त्यांच्या क्रिया निर्मिकाच्याच क्रिया असतात..........जबरदस्त सत्य आहे हे ..सगळ्यात मोठ्ठा चमत्कार आहे हा !!!

अनुभव घ्या अनुभव घ्या ....काल तेच सांगण्यासाठी वाहतोय....सत्य समजले कि मुक्तता येते!!!......................


खरच ..""जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ".........देवत्व असेच आहे असे वाटते !!!


 
=========================लेखन -----हर्षल-------------