कधी वाटते चन्द्र होउन यावे..
तुझ्या दिव्य रूपावरी पाझरावे..
तुझे नेत्र मिटता..हलुवार तेथे ..
तुझ्या शांत निद्रेतूनी .स्वप्न व्हावे..
तुझे श्वास ते सौम्य ;झूलता जरासे
तुझे ओठ निशब्द ;हलता जरासे ;
तुझे भाव अव्यक्त समजून घ्यावे;
तुझे नाव हृदयात ऐसे वसावे..!
पसरला सभोती दिशांचा पसारा..
पसरला जगाचा असा खेळ सारा..
तरी त्यात माझे नसे चित्त काही..
तुझ्यावीण ते सौख्य येणार नाही..
इथे मानवान्च्या महाभव्य जत्रा
क्षणांच्या सुखाच्या बहुरंग यात्रा;
तरी त्यात नाही सुखाचा निवारा..
तुझ्यावीण हां जन्म निर्जीव सारा.......!!
हर्षल ............१८डी १०
तुझ्या दिव्य रूपावरी पाझरावे..
तुझे नेत्र मिटता..हलुवार तेथे ..
तुझ्या शांत निद्रेतूनी .स्वप्न व्हावे..
तुझे श्वास ते सौम्य ;झूलता जरासे
तुझे ओठ निशब्द ;हलता जरासे ;
तुझे भाव अव्यक्त समजून घ्यावे;
तुझे नाव हृदयात ऐसे वसावे..!
पसरला सभोती दिशांचा पसारा..
पसरला जगाचा असा खेळ सारा..
तरी त्यात माझे नसे चित्त काही..
तुझ्यावीण ते सौख्य येणार नाही..
इथे मानवान्च्या महाभव्य जत्रा
क्षणांच्या सुखाच्या बहुरंग यात्रा;
तरी त्यात नाही सुखाचा निवारा..
तुझ्यावीण हां जन्म निर्जीव सारा.......!!
हर्षल ............१८डी १०
No comments:
Post a Comment