हे दुख उरात कशाचे
एकटेच सजुनी बसते ?
त्या दूर भविष्यालाही
अवघडसे कोडे पडते !
तू समोर येता माझ्या
अश्रुंच्या उठल्या लाटा !
पसरल्या उजळूनी येथे
त्या काजळलेल्या वाटा !!
डोळ्यांची धूसर वळणे
दु:खांची ओंजळ भरते
एकेक पापणीलाही
विरहाचे स्वप्न उमगते !
हे स्पर्श सनातन उरले
अंतरात एकांताने !
कोवळी जळूनी गेली
प्रेमाची हळवी राने !!
अंधार सोबती झाला
चंद्राचे रंग उलटले !
दिवसांच्या देहांमधुनी ,
रात्रींचे देह मिसळले !
''''''''
No comments:
Post a Comment